Dasara Melava 2023 : दसरा मेळाव्यांसाठी १५ हजार पोलीसांसह राज्य राखीव दलाच्या ३३ तुकड्या तैनात

उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना यांच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई पोलिसांनी दोन्ही ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

108
Dasara Melava 2023 : दसरा मेळाव्यांसाठी १५ हजार पोलीसांसह राज्य राखीव दलाच्या ३३ तुकड्या तैनात
Dasara Melava 2023 : दसरा मेळाव्यांसाठी १५ हजार पोलीसांसह राज्य राखीव दलाच्या ३३ तुकड्या तैनात

उबाठा आणि शिवसेना यांच्या दसरा मेळाव्यांसाठी मुंबई पोलिसांनी दोन्ही ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आझाद मैदान आणि शिवाजी पार्क या दोन ठिकाणी एकाच वेळी होणाऱ्या दसरा मेळाव्यांसाठी जवळपास १५ हजार मुंबई पोलिसांची फौज सह राज्य राखीव दलाच्या ३३ तुकड्या, क्युआरटी आणि गृहरक्षक (होमगार्ड) बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. त्याच बरोबर मुंबईतील वाहतूकीवर परिणाम होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रणसह दसरा मेळाव्यांसाठी येणाऱ्या वाहन चालकांना मार्गदर्शन करतील. दरम्यान, मुंबईत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांकडून वाहतूक मार्गिकेमध्ये तात्पुरता बदल करून काही मार्ग बंद करण्यात आले आहे. (Dasara Melava 2023)

यंदा दादरच्या शिवाजी पार्क येथे उबाठाकडून तर शिवसेनेकडून आझाद मैदान या ठिकाणी दसरा मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही दसरा मेळाव्यांसाठी केवळ मुंबईतुनच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून दोन्ही गटाचे शिवसैनिक मुंबईत दाखल होणार आहे. या दरम्यान मुंबईत लाखोंच्या संख्येने शिवसैनिक मोठ्या प्रमाणात खाजगी वाहनातून मुंबईत दाखल होणार असल्यामुळे मुंबईत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे. (Dasara Melava 2023)

(हेही वाचा – DCM Devendra Fadnavis : ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही, टिकणारे मराठा आरक्षण देणार)

दरम्यान, या दोन्ही मेळाव्यांच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखणेकामी इतर बंदोबस्त याकरीता मुंबई पोलीस आयुक्त, विशेष पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सह आयुक्त (का. व सु.), मुंबई ह्यांचे देखरेखीखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे. मुंबई पोलीस दलाकडून ६ अपर पोलीस आयुक्त, १६ पोलीस उप आयुक्त, ४५ सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह २४९३ पोलीस अधिकारी व १२४४९ पोलीस अंमलदार बंदोबस्तकामी तैनात करण्यात आलेले आहेत. तसेच महत्वाच्या ठिकाणी ३३ राज्य राखीव दलाच्या तुकड्या (SRPF) शीघ्र कृती दल (QRT) आणि गृहरक्षक दलाचे जवान (होमगार्डस्) तैनात करण्यात आले आहे. (Dasara Melava 2023)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.