Andheri Gokhale Bridge : अंधेरीतील गोखले पूल बांधकामाच्या पाहणीसाठी आयुक्त रस्त्यावर, पण अतिरिक्त आयुक्तांना घेतले नाही सोबत

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे.

286
Andheri Gokhale Bridge : अंधेरीतील गोखले पूल बांधकामाच्या पाहणीसाठी आयुक्त रस्त्यावर, पण अतिरिक्त आयुक्तांना घेतले नाही सोबत
Andheri Gokhale Bridge : अंधेरीतील गोखले पूल बांधकामाच्या पाहणीसाठी आयुक्त रस्त्यावर, पण अतिरिक्त आयुक्तांना घेतले नाही सोबत

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये सुमारे १,३०० टन वजनाच्या पहिल्या गर्डरची जोडणी पूर्णत्वास आली आहे. प्रकल्प स्थळी सुमारे २५ मीटर उंचीवर सुट्या भागांची जोडणी करून आता हा गर्डर तयार झाला आहे. त्यास रेल्वे रूळ मार्गावर १०० मीटर अंतर पुढे नेणे, त्यानंतर उत्तरेला सुमारे साडे तेरा मीटर सरकवणे आणि नंतर सुमारे साडेसात मीटर अंतर खाली आणणे, ही अभियांत्रिकी दृष्ट्या आव्हानाची कामे पार पाडावी लागणार असून यासर्व पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी प्रकल्प स्थळी पाहणी दौरा केला. त्यामुळे आयुक्त पुन्हा एकदा रस्त्यावर फिरु लागल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांना सोबत न घेताच आयुक्तांनी हा दौरा केल्याने सर्वांचाच भुवया उंचावल्या आहेत. (Andheri Gokhale Bridge)

अंधेरी येथील गोपालकृष्ण गोखले पुलाचा पहिला गर्डर स्थापन करण्यासह पुलाच्या इतर कामांची प्रगती जाणून घेण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी २३ ऑक्टोबर २०२३) प्रत्यक्ष प्रकल्प स्थळी भेट देवून पाहणी केली. या पाहणीप्रसंगी स्थानिक आमदार अमीत साटम, सह आयुक्त (परिमंडळ ३) रणजित ढाकणे, उपायुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पूल) संजय कौंडण्यपुरे, के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू, के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान आणि रेल्वे प्रशासन व महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. या पुलाच्या संपूर्ण बांधकामावर अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू हे लक्ष ठेवून आहेत. परंतु सोमवारी ते मुख्यालयातील आपल्या कार्यालयात असतानाही आयुक्तांनी त्यांना सोबत न घेताच हा पाहणी दौरा केला. (Andheri Gokhale Bridge)

(हेही वाचा – BMC : महानगरपालिका सचिव विभागातील ब्रिटिशकालीन दीडशे वर्षांपूर्वीचे ‘सील’ यंत्र आजही कार्यरत)

दरम्यान, पुलाच्या कामांना वेग देण्याच्या दृष्टीने स्थानिक आमदार अमीत साटम, रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि इतर अधिकारी तसेच महानगरपालिकेच्या सर्व संबंधित खात्यांची शुक्रवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२३ रोजी महानगरपालिका मुख्यालयात संयुक्त बैठक घेणार असल्याचे यावेळी महानगरपालिका आयुक्त चहल यांनी सांगितले. रेल्वे प्रशासनासोबत अचूक समन्वय साधने आणि वेळापत्रकाप्रमाणे कामे पार पाडणे आवश्यक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांनी आज प्रकल्प स्थळी पाहणी दौरा केला. त्यानंतर महानगरपालिका आयुक्त चहल यांनी प्रकल्पाशी संबंधित अधिकारी आणि सल्लागार, कंत्राटदार यांच्याकडून पुलाच्या बांधकामाची प्रगती तसेच पहिला गर्डर स्थापन करण्याचे नियोजन, त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून लागणारे सहाय्य याची सर्व माहिती जाणून घेतली. (Andheri Gokhale Bridge)

याप्रसंगी बोलतांना चहल यांनी, गोखले पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामध्ये कोणताही विलंब होऊ नये, तसेच अवाढव्य गर्डर स्थापन करण्याची सगळी कामे महानगरपालिका आणि रेल्वेच्या समन्वयातून अचूकपणे पार पडावीत, यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रारंभापासून प्रयत्न करीत आहे. असे सांगितले. असे असले तरी गर्डर स्थापन करताना कोणताही अडसर येऊ नये, यासाठी शुक्रवार २७ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १ वाजता महानगरपालिका मुख्यालयात बैठक घेण्यात येईल. या बैठकीमध्ये पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक, संबंधित रेल्वे अधिकारी, महानगरपालिकेचे सर्व संबंधित अधिकारी, कंत्राटदार यांच्यासह स्थानिक आमदार अमीत साटम यांनाही निमंत्रित करण्यात येईल. जेणेकरून आगामी सर्व नियोजन एकाचवेळी ठरवून, संभाव्य अडचणींचे निराकरण करण्याबाबत चर्चा करता येईल, असे आयुक्त चहल यांनी नमूद केले. (Andheri Gokhale Bridge)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.