Shastra Poojan : शस्त्रपूजनावेळी शपथ घ्या… देशाला गरज भासेल तेव्हा ते शस्त्र मी हाती घेईन ; मंजिरी मराठे यांचे आवाहन

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने सोमवारी (२३ ऑक्टोबर) रोजी सावरकर सभागृहात शस्त्रपूजन करण्यात आले.

162
Shastra Poojan : शस्त्रपूजनावेळी शपथ घ्या... देशाला गरज भासेल तेव्हा ते शस्त्र मी हाती घेईन ; मंजिरी मराठे यांचे आवाहन
Shastra Poojan : शस्त्रपूजनावेळी शपथ घ्या... देशाला गरज भासेल तेव्हा ते शस्त्र मी हाती घेईन ; मंजिरी मराठे यांचे आवाहन

इस्त्रायलमध्ये आज जी परिस्थिती आहे, ती आपल्याकडेही उद्भवू शकते. कारण, काही शक्तींकडून तसे प्रयत्न सुरू आहेत. मातृभूमीच्या रक्षणासाठी इस्त्रायलमध्ये स्त्रियांपासून सगळेजण शस्त्र घेऊन उभे आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून आपल्याकडील तरुणांनीही शस्त्रकलेमध्ये पारंगत झाले पाहिजे. त्यामुळे आज आपण शस्त्राची नुसती पूजा न करता, यातून संदेश देणार आहोत की, जेव्हा देशाला गरज भासेल तेव्हा ते शस्त्र मी हाती घेईन, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी केले. (Shastra Poojan)

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने सोमवारी (२३ ऑक्टोबर) रोजी सावरकर सभागृहात शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, त्याचप्रमाणे स्मारकात होणाऱ्या सर्व उपक्रमांचे प्रशिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. यावेळी सावरकर स्मारकात चालणाऱ्या उपक्रमांमधील साहित्याचे पूजन करण्यात आले. तसेच कलाप्रबोधीनीच्या वतीने गणेशस्तुती या प्रकारातून कथ्थक नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मंजिरी मराठे म्हणाल्या, ब्रिटिश ज्यावेळी आपल्याला शस्त्र हाती घेऊ देत नव्हते, भारतीयांसाठी शस्त्रबंदीचा कायदा त्यांनी केला होता, तेव्हा वीर सावरकरांनी सांगितले की, ब्रिटिशांच्या सैन्यात शिरा. तेथे जाऊन शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घ्या. कारण, एकवेळ अशी येईल, की त्यांच्या बंदुकीची नळी कुठल्या दिशेला फिरवायची याचा निर्णय तुमच्या हाती असेल. सावरकरांच्या या कुटनीतीची गरज आताही आपल्याला भासू शकते, असेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचा : SRA : एसआरएच्या २२७ इमारतींना दरवर्षी फायर ऑडीट बंधनकारक)

सावरकर स्मारकाच्या खेळाडूंचा जगभरात डंका

  • स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात क्रीडा प्रकारातील विविध उपक्रम चालतात. त्यातील खेळाडूंनी यावर्षी अनेक पदके जिंकून जगभरात स्मारकाचे नाव पोहोचवले आहे. शस्त्रपूजनावेळी या उपक्रमांच्या प्रशिक्षकांनी याबाबत माहिती दिली. मुष्ठीयुद्ध प्रशिक्षक राजन जोथाडी म्हणाले की, बॉक्सिंगमध्ये स्मारकाच्या खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये आतापर्यंत ६१ सुवर्ण, १६ रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली आहे.
  • तायक्वांदो प्रशिक्षक राजेश खिलारी यांनी सांगितले की, सावरकर स्मारकात तायक्वांदो प्रशिक्षणाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. आधी याची गणती मार्शल आर्टमध्ये होत होती. आता हा क्रीडाप्रकार झाला आहे. त्यामुळे इतरत्र तायक्वांदो हे क्रीडा प्रकार म्हणून शिकवले जात असले, तरी सावरकर स्मारकात क्रीडा आणि युद्ध अशा प्रकारांत शिकवले जाते.
  •  आम्ही तायक्वांदोच्या माध्यमातून आम्ही आमचे बाहू अशाप्रकारे तयार करीत आहोत की, जेव्हा देशाला आमची गरज भासेल, तेव्हा आम्ही आघाडीवर उभे असू, असेही खिलारी म्हणाले. सावरकर स्मारकात तायक्वांदोचे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंनी नुकतीच एशियन चॅम्पियनशिपमध्ये ५ पदके मिळवली आहेत. त्या पाचही मुलांनी यावेळी सादरीकरण केले.
  •  हिंदूंचे सैनिकीकरण आणि राजनीतीचे हिंदुकरण, हे वीर सावरकरांचे तत्व होते. या तत्वांपासून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. शिवाय युट्युबवर निशुल्क मार्गदर्शन केले जाते, अशी माहिती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक महेश कुलकर्णी यांनी दिली.
  •  कथ्थक वर्गाच्या वतीने आरोही तळवलकर या विद्यार्थीनीने प्रातिनिधिक भाषण केले. कलाप्रबोधीनीच्या सहकार्याने स्मारकात २५० हून अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेतात. गुरुवर्य रुपाली देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी देश-विदेशातील स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत, असे तिने सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.