SRA : ‘एसआरए’च्या इमारतींचा दोष दायित्व कालावधी ३ वर्षां ऐवजी १० वर्षे?

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या पुनर्वसन इमारतींचा तीन वर्षांचा हमी कालावधी हा संबंधित विकासकाचा आहे.

368
SRA : 'एसआरए'च्या इमारतींचा दोष दायित्व कालावधी ३ वर्षां ऐवजी १० वर्षे?
SRA : 'एसआरए'च्या इमारतींचा दोष दायित्व कालावधी ३ वर्षां ऐवजी १० वर्षे?

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या पुनर्वसन इमारतींचा तीन वर्षांचा हमी कालावधी हा संबंधित विकासकाचा आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ३ वर्षाकरिता असलेला दोषदायित्‍व कालावधी १० वर्षाचा करण्‍यात यावा, अशी शिफारस गोरेगाव आगीच्या दुघर्टनेची प्राथमिक चौकशी करणाऱ्या समितीने केली आहे. तसेच इमारतीतील सर्व मजल्‍यावरील सदनिकांची घनता विचारात घेऊन, त्‍याप्रमाणे विकासकाने इमारतीमध्‍ये प्रत्‍येक मजल्‍यावर सामान्‍य खुली जागा आणि एकापेक्षा अधिक जिन्‍यांची व्‍यवस्‍था करावी. त्‍याचप्रमाणे या जिन्‍यांची रुंदी २ मीटरपेक्षा जास्‍त ठेवणे सक्‍तीचे करण्‍यात यावे, अशीही शिफारस या चौकशी समितीने केली आहे. (SRA)

उन्नत नगर, गोरेगाव (पश्चिम) जय भवानी एस. आर. ए. को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथे लागलेल्या आगीत ७ जणांचा मृत्यू झाला होता. तर ५१ जण जखमी झाले होते. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समितीने प्राथमिक चौकशी अहवाल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांना सादर केला. त्यात भविष्यात आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी समितीने उपाययोजना सुचविल्या आहेत. (SRA)

इमारतीच्या वाहनतळाच्या जागेत वाहनांशिवाय अन्य वापर करण्यास बंदी

या अहवालामध्ये या समितीने पुनर्वसन इमारत आणि विक्री इमारतमधील रहिवाश्‍यांच्‍या दुचाकी व चारचाकी वाहने उभी करावयाच्‍या जागा यांचे योग्‍यरित्‍या वाटप करणे आवश्‍यक आहे. या जागा गाड्या उभ्‍या करण्‍याव्‍यतिरिक्‍त इतर कोणत्‍याही कारणास्‍तव वापर करण्‍यास मनाई करण्‍यात यावी. तसेच, पुनर्वसन इमारतीतील छज्जा, सदनिकांवरील मोकळी जागा, पायऱ्या, इमारतीतील मोकळी जागा व पार्किंगची जागा येथे कोणत्‍याही प्रकारचे सामान, आग लागेल अशा प्रकारचे द्रव्‍य/केमीकल, लाकडी सामान, कपड्यांची गाठोडी इत्‍यादी ठेवण्‍यास सक्‍त मनाई करण्‍यात यावी, असे नमुद केले आहे. (SRA)

(हेही वाचा – SRA Fire OC : आगीबाबतच्या एनओसीतील अटींची पूर्तता होत नाही तोवर ओसी नाही)

अरुंद रस्त्यांवर वाहने उभी करण्यासंदर्भात नियमावली

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी याबाबत समिती स्‍थापन करुन त्‍यांच्‍यामार्फत या सूचनांचे इमारतीतील रहिवाश्‍यांमार्फत पालन होत आहे की नाही, याबाबत वेळोवेळी तपासणी करणे सक्‍तीचे करण्‍यात यावे. मुंबईत ज्‍या ठिकाणी अरुंद गल्‍ल्‍या असतील अशा ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहन पार्किंग संदर्भात आवश्‍यक ती नियमावली बनवून त्‍याचे काटेकोरपणे पालन करण्‍याबाबत पोलीस प्रशासनाला निर्देश देण्‍यात येतील. (SRA)

समितीच्या शिफारशींनुसार कारवाई करण्याचे प्राधिकरणाला अधिकार

या प्रकरणी मुंबई अग्निशमन दल, पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राथमिक अहवाल प्राप्‍त झाले आहेत. या अहवालांमध्‍ये तपासाची पुढील प्रक्रिया सुरु असल्‍याबाबत नमूद करण्‍यात आले आहे. त्‍याअनुषंगाने त्‍यांच्‍याकडून करण्‍यात येत असलेल्‍या पुढील तपासात निदर्शनास येणाऱ्या बाबींच्‍या अनुषंगाने पुढील आवश्‍यक ती कारवाई संबंधित प्राधिकरण त्‍यांच्‍या स्‍तरावर करतील, असेही नमुद केले आहे. (SRA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.