Pravin Darekar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुती सरकारच आरक्षण देतील; प्रविण दरेकरांचा दावा

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मराठा समाजाच्या नेत्यांना डावलण्याचेच काम केले.

185
जाहीर नाराजी व्यक्त करणाऱ्या युतीतील नेत्यांची BJP कडून कानउघडणी

मराठा समाजाला निश्चितपणे आरक्षण मिळवून देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीचे सरकारच करेल, असा ठाम दावा भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना केला. दरेकर म्हणाले की, मनोज जरांगे-पाटील यांचा मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे, याबद्दल शंका नाही. समाज व सर्वचजण त्यांच्या भूमिकेसोबतच आहोत. मात्र अनेक भुमिका पुढे येताहेत. अशात आज मराठा क्रांती मोर्चाने पत्रकार परिषद घेऊन सरसकट कुणबी दाखल्यासंदर्भात कोर्टाच्या निर्णयाचा दाखला दिला. त्यामुळे मराठा समाजाची भावना आज प्रत्येकजण बोलायला लागला आहे. मराठा समाजाची भुमिका ही कुठल्या दुसऱ्या समाजाचे आरक्षण रद्द करून नकोय ही आहे. तर समाजाला स्वतंत्र आरक्षण हवेय हीच सार्वत्रिक भुमिका आज पुढे येताना दिसत असल्याचे दरेकर यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. (Pravin Darekar)

दरेकर पुढे म्हणाले की, पूर्वीही लाखोंचे मोर्चे निघाले. त्या मोर्चाला चेहरा नव्हता. मराठा समाजाच्या प्रश्नांची, भावनांची गर्दी होती. चेहरा असला नसला तरी आपल्या प्रश्नांची तीव्रता एवढी आहे की समाज त्यासाठी एकवटून लाखोंची गर्दी जमवतो. त्यामुळे समाजात फूट पडणार नाही. कोण फूट पाडू देणार असतील तर ते सहनही करणार नाही. आम्ही सर्व जरांगेसोबत असूच. मराठा क्रांती मोर्चाची भुमिका आवडली. जेव्हा आपण विशिष्ट हेतूने सरकारवर दोषारोप करतो त्यावेळेला शंकाकुशंका निर्माण होतात.मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण हवे आहे, अशाच प्रकारची सार्वत्रिक भुमिका समाजाची असल्याकडे दरेकर यांनी लक्ष वेधले. दरेकर पुढे म्हणाले की, जाहिरातीवरून वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये येताहेत. अशोक चव्हाण, संजय राऊत वक्तव्य करताहेत. मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मधून जो काही लाभ मिळाला आहे तो सांगण्याइतपत ती जाहिरात होती. परंतु माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे अवसरवादी आहेत. मराठा आरक्षण उपसमितीचे आपण अध्यक्ष असताना काय निष्काळजीपणा केलात ते महाराष्ट्राने, मराठा समाजाने पाहिले आहे. मग आता आयती पोळी भाजता येते का? अशा प्रकारचा अवसरवादी प्रयत्न चव्हाण यांचा असल्याची टिकाही दरेकर यांनी केली. (Pravin Darekar)

तसेच संजय राऊत यांचाही दरेकर यांनी समाचार घेतला. संजय राऊत हेही तशाच प्रकारचे संधीसाधू वक्तव्य करताहेत. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात आरक्षणासंदर्भात काय केलात? ते सांगत नाहीत. उलट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मराठा समाजाच्या नेत्यांना डावलण्याचेच काम केले. त्यामुळे मराठा समाजाप्रती काय प्रेम आहे हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाच्या बाजूने ठाम आहेत.त्यांना समाजाची कुठलीही दिशाभूल करायची नाही. संविधानाच्या आधारे टिकणारे आरक्षण त्यांना द्यायचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मराठा आरक्षणाविषयी भूमिकेवर कोणी संशय घेऊच शकत नसल्याचेही दरेकर यांनी ठामपणे सांगितले. दरेकर पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले. कोर्टात टिकले, सुप्रीम कोर्टातही नाकारले गेले नाही. उद्धव ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे, दुर्लक्षपणामुळे ते गेले. त्यामुळे आरक्षण बाजूने सकारात्मक भुमिका असणारे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवार यांनीही मी सुद्धा मराठा समाजातून आलोय, समाजाप्रती माझ्याही संवेदना आहेत, असे म्हटलेय. मग शिंदे, फडणवीस आणि पवार यांनी कुठे मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात भुमिका घेतली? कुठे टाळाटाळ केली? परंतु त्यांना शास्वत आरक्षण द्यायचे आहे. समाजाची दिशाभूल करायची नाही. हे समजण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. (Pravin Darekar)

(हेही वाचा – SRA : ‘एसआरए’च्या इमारतींचा दोष दायित्व कालावधी ३ वर्षां ऐवजी १० वर्षे?)

ते पुढे म्हणाले की, मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या करू नये ही सरकारची भुमिका आहे. मात्र, सरकारनेही गांभीर्याने लक्ष देऊन यावर एक वेगळी यंत्रणा उभी करण्याची अपेक्षा आहे. मराठा समाजात मतभेद असतील पण मनभेद नाहीत. त्यामुळे कुणीही मराठा समाजाच्या हिताची भुमिका घेताना आडवे येणार नाही. परंतु राजकीय भुमिका कुणी घेता कामा नये. आपल्याला कोणीतरी चालवतेय अशा प्रकारची शंका समाजाला येता कामा नये. आम्ही सर्व जरांगे यांच्यासोबत आहोत. नारायण राणे, रामदास कदम बोलले म्हणजे आपली भुमिका मांडायची नाही असे कारण नाही. प्रत्येकाला आपले मत असते. ते मांडण्याचा अधिकार लोकशाहीने दिला आहे. मतमतांतरे काहीही असली तरी मराठा समाज एक आहे. मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. टिकलेले आहे. सुप्रीम कोर्टाने नाकारलेले नाही. त्याबाबत क्यूरेटिव्ह पिटीशन दाखल झाली आहे. त्यावर सरकार मार्ग शोधत असून निश्चितपणे मराठा समाजाला सरकार आरक्षण देईल यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही ठाम विश्वास आहे. आरक्षण मिळाले तर एकनाथ शिंदे आणि हेच सरकार देईल, असाही दावा पुन्हा एकदा दरेकर यांनी केला. (Pravin Darekar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.