जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी उबाठा आमदार रवींद्र वायकर यांच्याकडे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ६ तास चौकशी नंतर त्यांना सोडण्यात आले. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेकडून रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांनाही समन्स बजावण्यात आले आहे. जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळा प्रकरणी चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर महिण्यात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने शिवसेना उबाठा गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना मागील आठवड्यात समन्स बजाविण्यात आले होते. सोमवारी त्यांना आर्थिक गुन्हे शाखेत संबंधित अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे समन्समध्ये म्हटले होते. (Ravindra Waikar)
वायकर हे सोमवारी दुपारी मुंबई पोलीस मुख्यालयात असणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेत झाले होते. आर्थिक गुन्हे शाखेने जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी त्यांच्याकडे तब्बल ६ तास चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांचे देखील नाव असल्यामुळे सोमवारी मनीषा वायकर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स बजविण्यात आले. रवींद्र वायकर यांची सहा तासांच्या चौकशी नंतर त्यांना रात्री ८ वाजता सोडण्यात आले. (Ravindra Waikar)
(हेही वाचा – Israel-Hamas Conflict: …तरच हे युद्ध थांबू शकतं, इस्त्रायलने युद्ध थांबवण्यासाठी हमासला दिला पर्याय)
जोगेश्वरी भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल बांधकाम प्रकरणी रवींद्र वायकर यांच्यावर सप्टेंबर महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणामध्ये रवींद्र वायकर यांनी आधीच न्यायालयातून अटकपूर्व जामीन घेतला आहे. या गुन्ह्यात त्यांच्या पत्नीसह आणखी काही जणांची नावे आहेत. जोगेश्वरी येथील खेळाच्या मैदान असलेल्या २ लाख चौरस फुटाच्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधण्यासाठी रवींद्र वायकर यांनी परवानगी दिली होती असा आरोप करण्यात आला होता. भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी ११ मार्च २०२३ रोजी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या तक्रारी नंतर आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता. महानगरपालिकेने दोन महिन्यांपूर्वी वायकर यांना बांधकामासाठी दिलेली परवानगी रद्द करून बांधकामाला स्थगिती दिली आहे. (Ravindra Waikar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community