- ऋजुता लुकतुके
क्यूजे या चायनीज मोटार कंपनीची नवीन बाईक बेनेली ६००आरआर भारतात डिसेंबर महिन्यात लाँच होणार आहे. आणि तिची किंमत आहे तब्बल ६.५ लाख रुपये
चायनीज मोटर कंपनी क्यूजे यांनी बनवलेली स्पोर्ट्स बाईक (HL : Benelli 600RR ) अखेर भारतातही लाँच होणार हे निश्चित झालंय. आणि यावर्षी डिसेंबर महिन्यात ती भारतीय रस्त्यांवर धावायला लागेल. लाल रंगाची आणि ६०० सीसी इंजिन क्षमतेची ही बाईक नेकेड स्पोर्टबाईक म्हणून ओळखली जाते.
लिक्विड कूल्ड आणि चार सिलिंडर असलेलं इंजिन या बाईकमध्ये आहे. आणि ते ८० बीएचपी इतकी शक्ती निर्माण करू शकतं. हीच या बाईकची खासियत आहे.
या बाईकचं वजन चक्क २२५ किलो आहे. आणि ग्राऊंड क्लिअरन्स १४० मिमीचा आहे. इंधनाची टाकी १६.४ लीटर क्षमतेची आहे. या बाईकला पाच इंचांची एलईडी स्क्रीन देण्यात आली आहे. आणि या स्क्रीनला दिवस-रात्रीचं सेटिंग आहे. चावीशिवाय ही गाडी स्टार्ट होऊ शकते. याशिवाय गाडीची इतर माहिती अजून फारशी उघड झाली नाहीए.
The Benelli 600RR has been spied in production-ready form. It gets a 600cc, inline-4 engine making 81 HP. This motorcycle shares its chassis and mechanicals with the TNT 600i. The Benelli 600RR will be Euro5/BS6 compliant and is expected to arrive in India too. pic.twitter.com/ryRQipzQUV
— MotorBeam (@MotorBeam) May 25, 2020
सुरुवातीला बेनेली ६००आरआर ही बाईक भारतात आणण्याचा कंपनीचा विचार नव्हता. पण, अखेर डिसेंबर महिन्यात बाईक भारतातही लाँच होईल. या बाईकची किंमत आहे ६.५ लाख रुपये. क्यजे कंपनीची बेलेनी आणि मोटो मरिनी या ब्रँडच्या चार गाड्या यापूर्वी भारतात लाँच झाल्या आहेत. आणि सगळ्यात ही बाईक महागडी आहे.
या बाईकची स्पर्धा होंडा सीबीआर ६५०आर तसंच कावासाकी निंजा ६५० या इतर बाईक सोबत असेल. बेनेली ६०० आर ही बाईक दोन प्रकारांमध्ये उपलब्ध होईल असं बोललं जातंय.
Join Our WhatsApp Community