आज राज्यात एकीकडे दसऱ्याचं उत्साही वातावरण आहे तर दुसरीकडे दसरा मेळाव्याचं (Dasara Melava 2023) वातावरण आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांचे मुंबईत आज मेळावे होत आहेत. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची भाषणे होतील. या मेळाव्यामधून कोण काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर, अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचीसुद्धा आज सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आज ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्क येथे तर शिवेसेनेचा मेळावा (Dasara Melava 2023) आझाद मैदानावर होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर उबाठा गटाने सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत आणि लोकांना या सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडिओमध्ये, सेनेच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या प्रवासाचा उल्लेख करण्यात आला आहे.
(हेही वाचा – Lalit Patil Drug Case : ललित पाटील नदीच्या पाण्यात ड्रग्ज लपवायचा; जाणून घ्या नेमका प्रकार काय?)
तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः आझाद मैदानाला (Dasara Melava 2023) भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. तसेच बैठकीसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवश्यक त्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Dasara Melava 2023) यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आम्ही काही वर्षांपूर्वी निर्णय घेतला होता बाळासाहेबांच्या कल्पना पुढे नेण्यात आम्ही गुंतलो आहोत. उद्यापासून या आझाद मैदानातून पुन्हा एकदा शिवसैनिकांच्या तोंडातून गर्जना ऐकू येईल.” यावेळी (Dasara Melava 2023) माजी मंत्री विजयबापू शिवतारे आणि पक्षाचे माझे सर्व प्रमुख सहकारी उपस्थित राहतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community