ऋजुता लुकतुके
या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ (Virat Kohli) सतत प्रवास करतोय. तसेच संघाचे सामनेही लागोपाठ आहेत. आता न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यानंतर मात्र संघाला सहा दिवसांची सुटी आहे. म्हणजे टीम इंडियाचा पुढचा सामना आता थेट २९ ऑक्टोबरला पुढच्या रविवारी होणार आहे.
त्यामुळे खेळाडूंनी रविवारच्या सामन्यानंतर सोमवारचा दिवस थंड धरमशालामध्येच घालवण्याचं ठरवलं होतं. न्यूझीलंड विरुद्ध ९५ धावांची निर्णायक खेळी खेळणारा विराट कोहलीही (Virat Kohli) सोमवारी आराम करताना दिसला. इतकंच नाही. तर पूलवर शांत वेळ घालवतानाचा एक फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केला.
कोहलीचे (Virat Kohli) इन्स्टाग्रामवर २३५ दशलक्ष पेक्षा जास्त फॉलोअरस आहेत. विराटचा हा फोटो आल्या आल्या चाहत्यांनी त्यावर लाखो प्रतिक्रिया आणि शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे. तसंच तो लाखो वेळा शेअरही झाला आहे. यात टोपी घातलेला विराट कोहली (Virat Kohli) शांतपणे पूलच्या पाण्यात बसलेला आपल्याला दिसतो.
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात २७४ धावांचं लक्ष समोर असताना विराट कोहलीने (Virat Kohli) निर्णयाक भूमिका निभावली. दुसऱ्या बाजूने मोठी साथ मिळाली नसताना एक बाजू लावून धरत त्याने धावगतीही आटोक्यात ठेवली. आणि ९५ धावा करत संघाला विजयही मिळवून दिला.
(हेही वाचा – Dr. Mohan Bhagwat : समाजाच्या एकतेसाठी राजकारणापासून दूर जात विचार करण्याची गरज)
विराटने (Virat Kohli) ९५ धावा केल्या त्या १०४ चेंडूत, २ षटकार आणि ८ चौकारांच्या सहाय्याने. बांगलादेश विरुद्धच्या सामन्याप्रमाणेच इथंही विराटला शतकासाठी आणि भारतीय संघाला विजयासाठी सारख्याच धावांची गरज होती. म्हणूनच विराट ९५ धावांवर असताना षटकार मारून सामना संपवण्याच्या उद्देशाने मोठा फटका खेळायला गेला. आणि नेमका मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर बाद झाला. कोहलीचं शतक ५ धावांनी हुकलं. सचिन तेंडुलकरच्या ४९ एकदिवसीय शतकांच्या विक्रमाची बरोबरी करण्याची त्याची संधीही रविवारी हुकली.
पण, भारताने सामना जिंकला. आणि त्याचबरोबर गुणतालिकेत ५ पैकी ५ सामने जिंकून अव्वल क्रमांकही पटकावला.
भारतीय संघ आता सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुढील रविवारी लखनौच्या एकाना (Virat Kohli) क्रिकेट स्टेडिअमवर इंग्लंडशी दोन हात करणार आहे. इंग्लिश संघ या स्पर्धेत चार पराभवांनिशी नवव्या स्थानावर फेकला गेला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community