आज राज्यात एकीकडे दसऱ्याचं उत्साही वातावरण आहे तर दुसरीकडे दसरा मेळाव्याचं वातावरण आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांचे मुंबईत आज मेळावे होत आहेत. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची भाषणे होतील. या मेळाव्यामधून कोण काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर दुसरीकडे भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या ट्विटमुळे खळबळ उडाली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमधून आपण कायमच राजकारण सोडत असल्याचं सांगितलं आहे.
नेमकं काय म्हणाले निलेश राणे?
राजकारणात आता मन रमत नाही, असं सांगत त्यांनी राजकारणातून बाजूला होत असल्याचं जाहीर केलं आहे. ट्विटर पोस्ट करून दसऱ्याच्या दिवशीच त्यांनी हा (Nilesh Rane) मोठा राजकीय धक्का दिला आहे.
(हेही वाचा – Virat Kohli : न्यूझीलंड विरुद्धच्या विजयानंतर विराटने कसा घालवला सोमवारचा दिवस?)
निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्यासोबत राहिलात, त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. भाजपमध्ये खूप प्रेम मिळालं आणि भाजप सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी खूप नशीबवान आहे.
मी (Nilesh Rane) एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी (Nilesh Rane) व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र!
नमस्कार,
मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही.
मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम…
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 24, 2023
निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळातून चर्चा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या या निर्णयावर त्यांचे वडील नारायण राणे आणि बंधू नितेश राणे यांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. (Nilesh Rane)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community