ड्रगमाफिया ललित पाटीलला (Lalit Patil) पळून जाण्यासाठी मदत केल्याप्रकरणी अॅड. प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम या दोन जणींना नाशिक पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. अॅड. कांबळे यांच्याविषयी हिच्याबद्दल धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
अॅड. प्रज्ञा कांबळे ही अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलची मैत्रिण असून तिला त्याच्या या गुन्ह्यातील सर्व गोष्टिंची माहिती होती. अमली पदार्थ विक्रीतून मिळालेल्या पैशाचा तिने विनियोग केला. यावरून या गुन्ह्यात तिचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
(हेही वाचा – Live In Relationship : … तेव्हाच लिव्ह-इन-रिलेशनशिप सामान्य मानली जाईल; काय म्हणाले अलाहाबाद उच्च न्यायालय )
ललित पाटीलला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी अॅड. कांबळे आणि अर्चना निकम या दोघींना नाशिक पोलिसांनी अटक केली होती. पुणे पोलिसांनी या दोघींचा ताबा घेऊन बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्यांना अटक केली. त्या दोघींना शिवाजीनगर न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ती संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. ललित पाटीलने रुग्णालयातून पळून गेल्यानंतर नाशिकला जाऊन दोघींची भेट घेतली. यावेळी २५ लाख रुपये हस्तांतर केल्याचे निष्पन्न झाले. कांबळे हिला ‘एनडीपीएस’अंतर्गत आरोपी करण्यासंदर्भातील माहिती तपासाधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली. पोलीस कोठडीचा कालावधी राखीव ठेवून दोघींना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकील नीलिमा यादव इथापे यांनी केली. त्यानुसार, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
Join Our WhatsApp Community