राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात आज पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रेला सुरुवात करण्यात आली. (Sharad Pawar) ही यात्रा ८०० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. हा कमी प्रवास नाही, ४२ ते ४५ दिवसांचा हा प्रवास आहे. युवा संघर्ष यात्रा नव्या पिढीची दिंडी आहे. तरुणांना आत्मविश्वास देणारी ही यात्रा आहे. इतकेच नव्हे, तर गावागावांतील तरुणांना प्रोत्साहन देणारी ही यात्रा आहे, असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील टिळक स्मारक येथे युवा संघर्ष यात्रेच्या आशीर्वाद सभेत बोलताना विश्वास व्यक्त केला. (Sharad Pawar)
(हेही वाचा – Sextortion : मुंबईकर ‘सेक्सटॉर्शन’चा जाळ्यात, सेक्सटॉर्शनच्या नैराश्यातून मुंबईत दुसरी आत्महत्या)
रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेला आज पुण्यातून सुरूवात झाली. शरद पवार आणि रोहित पवार यांच्यावर जेसीबीमधून फुलांची उधळण करत युवकांकडून स्वागत करण्यात आले. पुण्यातील टिळक स्मारकाजवळ यात्रा पोहोचली असून टिळक स्मारक हॉलमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. ‘युवा संघर्ष यात्रा ही युवा पिढीची दिंडी आहे. समाजात जागृती करण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. या दिंडीतून युवा पिढीला प्रोत्साहन मिळेल’, असे शरद पवार म्हणाले. (Sharad Pawar)
शरद पवार पुढे म्हणाले की, युवकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण मध्यस्थी करू. त्यासाठी सर्व मागण्या एकत्रित करा, मुख्यमंत्र्यांच्या कानावर घाला. बैठक बोलवू, त्या वेळी या मागण्यांबाबत विचारमंथन करण्यासाठी आपण स्वतः उपस्थित राहू आणि मुख्यमंत्र्यांकडून मागण्याबाबत सकारात्मक उत्तर घेऊ, असेही यावेळी शरद पवार म्हणाले. (Sharad Pawar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community