मुंबईकर हा सेक्सटॉर्शनच्या (Sextortion) जाळ्यात अडकत चालला असून या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी आत्महत्येचा पर्याय निवडत असल्याचे समोर आले आहे. सेक्सटॉर्शन कॉलमुळे मुंबईत दोघांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मागील दोन महिन्यात उघडकीस आल्या आहे. ऑनलाइन लोन अॅप नंतर अनेक जण सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकत असून त्यातून बाहेर पडण्यासाठी आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घेत असल्याची ही बाब देशासाठी चिंतेची बाब आहे.
सेक्सटॉर्शनच्या (Sextortion) जाळ्यात अडकलेल्या एका रेल्वे कर्मचाऱ्याने सप्टेंबरमध्ये माटुंगा ट्रेन खाली आत्महत्या केली होती. तर दुसरी घटना सांताक्रूझ पश्चिम येथे घडली आहे.
सांताक्रूझ येथे घडलेल्या घटनेला दोन महिने उलटून गेल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. मानसिंग पवार असे सांताक्रूझ येथे आत्महत्या (Sextortion) करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. मानसिंग पवार यांनी एका प्रार्थनास्थळी ऑगस्ट महिन्यात गळफास लावून आत्महत्या केली होती. सांताक्रूझ पोलिसांनी हे प्रकरण गंभीरपणे न घेता अपमृत्यूची नोंद करून घेतली. मानसिंग पवार यांच्या पत्नीने दोन महिने पाठपुरावा करून मानसिंग पवार यांच्या मोबाईल फोन मध्ये मिळून आलेल्या आक्षेपार्ह व्हिडीओ आणि छायाचित्रे पोलीस ठाण्यात सादर केले त्यानंतर या घटनेची गंभीरता लक्षात आल्यानंतर सांताक्रूझ पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ४ अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मानसिंग पवार यांना एका कथित महिलेकडून फेसबुक वर आलेली रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर या कथित महिलेने पवार यांना व्हिडीओ कॉल करून तो कॉल रेकॉर्ड केला. त्या व्हिडीओमध्ये छेडछाड (Sextortion) करून मग तो व्हायरल करण्यात आला. त्यानंतर त्या व्हिडीओच्या माध्यमातून पवार यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. पवार यांनी या जाळ्यातून सुटण्यासाठी पत्नीचे दागिने विकून ५६ हजार पेटीएम वरून अज्ञात क्रमांकावर पाठवले, त्यानंतर देखील पवार यांचा पिच्छा सोडला गेला नाही. कधी दिल्ली पोलीस बनून तर कधी सीबीआय आधिकरी बनून पवार यांना धमकावण्यात येत होते. अनेक दिवस पवार हे तणावात होते व त्यांना नैराश्याने गाठले. या सर्वातून सुटका करून घेण्यासाठी अखेर मानसिंग पवार यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.
(हेही वाचा – CRPF Dogs: केंद्रीय पोलीस दलांमध्ये होणार देशी श्वानांचा समावेश)
ऑगस्ट महिन्यात मानसिंग पवार यांनी आत्महत्या केली. सांताक्रूझ पोलिसांनी (Sextortion) केवळ अपमृत्यूची नोंद केली होती. मानसिंग पवार यांच्या पत्नीला पती मानसिंग पवार यांच्या मोबाईल फोन मध्ये काही आक्षेपार्ह व्हिडीओ आणि छायाचित्रे मिळून आले आणि धक्काच बसला. पत्नीने याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांकडे तक्रार केली. तब्बल दोन महिने अर्जाचा पाठपुरावा केल्यानंतर सांताक्रूझ पोलिसांनी चार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी मानसिंग पवार यांनी ज्या बँक खात्यावर पैसे पाठवले होते त्या खात्याचा तपशील पोलिसांनी (Sextortion) मिळवला आहे. तसेच ज्या क्रमनाकावरून धमकीचे कॉल केले जात होते त्याची माहिती मिळवली असून हा सर्व प्रकार राजस्थान राज्यातील भरतपूर येथून करण्यात आलेला असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community