Dasara Melava : शिवसैनिकांऐवजी खासगी कंपनीच्या कामगारांवर झेंडे लावण्याची जबाबदारी

एकेकाळी शिवसेनेच्या प्रत्येक दसरा मेळाव्यासह प्रत्येक कार्यक्रमांच्या ठिकाणी भगवे झेंडे लावण्यासाठी शाखांमधील शिवसैनिक रात्रीपासून रस्त्यावर फिरत असायचा, तो काळ आता बदलला असून प्रत्यक्षात शिवसेनेला आपले भगवे झेंडे लावण्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंटला काम देण्याची वेळ आली आहे.

123
Dasara Melava : शिवसैनिकांऐवजी खासगी कंपनीच्या कामगारांवर झेंडे लावण्याची जबाबदारी
Dasara Melava : शिवसैनिकांऐवजी खासगी कंपनीच्या कामगारांवर झेंडे लावण्याची जबाबदारी

विशेष प्रतिनिधी, मुंबई

एकेकाळी शिवसेनेच्या प्रत्येक दसरा मेळाव्यासह प्रत्येक कार्यक्रमांच्या ठिकाणी भगवे झेंडे लावण्यासाठी शाखांमधील शिवसैनिक रात्रीपासून रस्त्यावर फिरत असायचा, तो काळ आता बदलला असून प्रत्यक्षात शिवसेनेला आपले भगवे झेंडे लावण्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंटला काम देण्याची वेळ आली आहे. (Dasara Melava) त्यामुळे शिवतिर्थावर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात झेंडे लावणाऱ्या शिवसैनिकांऐवजी परप्रांतीयच झेंडे बांधताना दिसत आहेत. उबाठा शिवसेनेने शिवतिर्थावरील व्यासपीठासह आसपासचा विभाग भगवामय करण्यासाठी खासगी कंपनीला कंत्राट दिले असून या कंपनीच्या माणसांकडून छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या परिसरात झेंडे लावले जात आहेत. परंतु या इवेंट मॅनेजमेंटकडून योग्यप्रकारे झेंडे लावले गेले नसल्याने अखेर शिवसैनिकांना मिळेल तिथे झेंडे बांधण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे. (Dasara Melava)

यंदा दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवतिर्थावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, न्यायमूर्ती रानडे मार्ग, एल जे मार्ग, केळुसकर मार्ग, एम बी राऊत मार्ग, तसेच गोखले मार्ग आदी मार्गांवर मोठ्या प्रमाणात भगवे झेंडे लावलेले असून हे झेंडे लावण्यासाठी चक्क उबाठा शिवसेनेने खासगी कंपनीला ठेका दिल्याची माहिती मिळत आहे. आजवर शिवसेनेच्या या दसरा मेळाव्यासाठी स्थानिक शिवसेना शाखांसह आसपासच्या शाखांच्या माध्यमातून प्रत्येक रस्त्यांवर भगवे झेंडे लावले जात असत. विभागप्रमुख हे या सर्व कामांवर विशेष लक्ष देऊन रस्त्यांच्या दोन्ही बाजूला झेंडे लावून घेत हा संपूर्ण परिसर भगवामय करण्याचा प्रयत्न करत असत. परंतु झेंडे बांधणारे शिवसैनिकच आता उरलेले नसल्यामुळे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या माणसांना झेंडे लावण्याचे काम दिल्याचे दिसून येत आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावर रात्रीपर्यंत झेंडे लावले गेले असले, तरी या झेंड्यांमुळे समाधान न झाल्याने अखेर स्थानिक शाखेच्या पदाधिकारी यांनी स्वत: रस्त्यावर उतरुन सभेपूर्वी काही तास अगोदर झेंडे बाधण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी जे गटप्रमुख आणि शिवसैनिक अशी कामे करताना दिसत होते, परंतु आता पदे भुषवणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाच आता झेंडे बांधण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले असे दिसून येत आहे. (Dasara Melava)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.