Maratha Reservation : धनगर आरक्षणासाठी मदत करणार, जरांगे-पाटील यांचे आश्वासन

135
Maratha Reservation : धनगर आरक्षणालासाठी मदत करणार, जरांगे-पाटील यांचे आश्वासन
Maratha Reservation : धनगर आरक्षणालासाठी मदत करणार, जरांगे-पाटील यांचे आश्वासन

मराठा समाज आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्याच दिवशी त्यांनी धनगर समाजाला पेटून उठण्याचं आवाहन केलं आहे. धनगर आरक्षणासाठी लागणारी मदत करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. चौंडी येथे आयोजित केलेल्या धनगर मेळावा कार्यक्रमात जरांगे पाटील (Manoj Jarange-Patil ) बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, ‘डोंगरात, दरीत, पाण्यात, पावसात तुम्ही मेंढरं चारता. तुमचं स्वप्न एकच आहे की, माझ्या वाट्याला कष्ट आले ते माझ्या लेकराच्या वाट्याला नकोत, पण कोणाचंच स्वप्न पूर्ण होत नाही. आरक्षणापायी स्वप्न भंग होतात. रात्रंदिवस कमावलेला पैसा वाया जातो. आमचा मराठा समाजही ऊस तोडायचा. रात्री-अपरात्री शेतात पाणी द्यायला जायचा. आमचं स्वप्न एकच आहे की, आमच्या वाट्याला जे कष्ट आले ते लेकराच्या वाट्याला येऊ नयेत. म्हणून आरक्षण पाहिजे. मराठा-धनगर आपल्या दोघांचं दुखणं एकच आहे.’

(हेही वाचा – Shivsena : शिवसेनेत असे कधी पाहिलंत का ? चक्क उद्धव, आदित्य आणि रश्मी ठाकरेंच्या स्वागतांचे फलक)

घराघरांत मराठा आरक्षण समजावण्यासाठी आम्ही कंबर कसली, तसं तुम्हाला धनगाराच्या शेवटच्या माणसापर्यंत आरक्षण अगोदर सांगावं लागेल. जर एकदा धनगाराची लाट उसळली तर या देशातील कोणतीच शक्ती आरक्षण देण्यापासून वाचवू शकणार नाही, पण ती कसरत तुम्हाला करावी लागणार. त्याशिवाय समाजाला न्याय मिळणार नाही, असा सल्लाही जरांगे पाटलांनी धनगर समाजाला दिला.

पडलेलं सरकार (विरोधक) म्हणतं की, मी निवडून आलो की, लगेच आरक्षण देतो, मग पडलेलं निवडून आलं की, दुसरं पडलेलं म्हणतं की, चारच दिवसांत देतो फक्त मोगलाई येऊ दे. आम्हाला किती दिवस फिरवणार? जागरुकता येणं महत्त्वाचं आहे. नुसतं भाषणं ठोकून उपयोग नाही, असंही जरांगे पाटील म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, आज आमचा शेवटचा दिवस आहे. धनगर बांधवांचा व्यवसाय शेती आहे. धनगर समाज घटनेत असून तुम्हाला आरक्षण कसं देत नाहीत? सामान्य धनगर बांधवांना डोकं लावावं लागेल. तुम्ही गप्प बसू नका. तुम्हाला तुमच्या लेकराबाळांचं चांगलं करायचं असेल तर तुम्हालाच पेटून उठावं लागेल. तुम्ही एसटी आहात, घटनेत तुम्हाला आरक्षण द्यायला मिळायला पाहिजे. तुम्ही घर न् घर जागं करा. मी शब्द देत आम्ही ताकदीने तुमच्या पाठिशी आहोत, असा विश्वासही त्यांनी धनगर समाजात निर्माण केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.