Rajnath Singh : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनच्या सीमेवर जवानांसोबत केले शस्त्रपूजन

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे लष्कराच्या जवानांसोबत दसरा साजरा केला. (Rajnath Singh) या वेळी संरक्षणमंत्र्यांनी शस्त्रपूजनही केले.

162
Rajnath Singh : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनच्या सीमेवर जवानांसोबत केले शस्त्रपूजन
Rajnath Singh : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनच्या सीमेवर जवानांसोबत केले शस्त्रपूजन

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे लष्कराच्या जवानांसोबत दसरा साजरा केला. (Rajnath Singh) या वेळी संरक्षणमंत्र्यांनी शस्त्रपूजनही केले. पूर्व लडाखमधील काही संघर्षाच्या ठिकाणी तीन वर्षांहून अधिक काळ भारत आणि चीन यांच्यात संघर्ष सुरू असताना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एल.ए.सी.) सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी सिंह यांनी सैन्यासह दसरा साजरा केला. सिंह गेल्या अनेक वर्षांपासून दसऱ्याच्या वेळी शस्त्रपूजन करत आहेत. यावेळी राजनाथ सिंह यांच्या समवेत तिन्ही सेनादलांचे प्रमुख जनरल मनोज पांडे हे देखील होते. राजनाथ सिंह आणि जनरल पांडे यांनी तवांग मध्ये फॉरवर्ड पोस्टवर जाऊन चीन सीमेची पहाणी केली. देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी चिनी सीमेवर जाऊन विजयादशमी साजरी करण्याचा हा गेल्या 75 वर्षांमधला पहिलाच प्रसंग ठरला. (Rajnath Singh)

(हेही वाचा – Shivaji Maharaj Horse Statue : छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा जम्मू काश्मीरसाठी रवाना)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठी पावले उचलण्यात आली आहेत. पूर्वी आपण आपल्या सैन्यासाठी आयातीवर अवलंबून असायचे. आज देशात अनेक प्रमुख शस्त्रे आणि प्लॅटफॉर्म तयार केले जात आहेत. परदेशी कंपन्यांना त्यांचे तंत्रज्ञान सामायिक करण्यासाठी आणि देशांतर्गत उद्योगासह भारतात उपकरणे तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. 2014 मध्ये संरक्षण निर्यातीचे मूल्य सुमारे 1000 कोटी रुपये होते, परंतु आज आम्ही हजारो कोटी रुपयांची संरक्षण उपकरणे निर्यात करत आहोत “, असे राजनाथ सिंह या वेळी म्हणाले. (Rajnath Singh)

भारत आणि चीन पूर्व लडाखमध्ये चीन वारंवार कुरापती काढत आहे. त्यामुळे सीमेवर तणावाचे वातावरण आहे. ‘जोपर्यंत सीमावर्ती भागात शांतता प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत चीनशी आपले संबंध सामान्य होऊ शकत नाहीत’, असे भारत सातत्याने सांगत आला आहे. पूर्व लडाखमधील संघर्षानंतर लष्कराने सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या विविध भागांसह सुमारे 3,500 किलोमीटर लांबीच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्य आणि शस्त्रास्त्रे तैनात केली आहेत. (Rajnath Singh)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.