इस्रायल-हमास यांच्यात युद्ध (Israel-Hamas Conflict) सुरू आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Hussein Obama) यांनी एक हजार शब्दांचे मोठे निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी हमासच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. ओमाबा यांनी हमासचा नायनाट करण्यासाठी अमेरिकेचा मित्र इस्त्रायलला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. निवेदनाद्वारे त्यांनी ‘आम्ही आमचा महत्त्वाचा मित्र इस्रायलसोबत आहोत, हमासचा नाश केला पाहिजे.’, अशी खात्रीही दिली आहे.
या निवेदनात राष्ट्राध्यक्ष बराक ओमाबा यांनी इस्रायलला स्वत:चा बचाव करण्याचा अधिकार आहे. याचे कारण सांगताना ते म्हणतात, २०१४ मध्ये जेव्हा इस्रायलने गाझामध्ये जमिनीवर कारवाई केली, तेव्हा ओमाबा राष्ट्राध्यक्ष होते. सोमवारी रात्री जारी केलेल्या या निवेदनात ओमाबांनी दोन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. पहिली म्हणजे इस्त्रायलला स्वत:चा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण तो दोषींना कशी शिक्षा देतो, हेही पाहावे लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे – इस्त्रायलची रणनिती जर अशी असेल त्यामुळे नागरिकांचे नुकसान होईल, तर त्याचे परिणाम विपरित असू शकतात.
गाझामध्ये बॉम्बस्फोटामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेक मुलांचा समावेश आहे. हजारो लोकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. यानंतर ओबामा यांनी गाझा ताब्यात घेण्याच्या इस्रायलच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि इशाराही दिला. ते पुढे म्हणाले की, मोठ्या लोकसंख्येला अन्न, पाणी आणि वीज पुरवठा बंद केल्याने हे मानवतावादी संकट आणखी वाढेल. पॅलेस्टाईनच्या येणार्या पिढ्या अधिक कट्टरवादी होतील आणि त्यामुळे जागतिक स्तरावर इस्रायलला मिळणारा पाठिंबा कमी होईल. एक प्रकारे, इस्रायल शत्रूंच्या हातात खेळू लागेल. या भागात फार काळ शांतता राहणार नाही.
(हेही वाचा – Maratha Reservation : धनगर आरक्षणासाठी मदत करणार, जरांगे-पाटील यांचे आश्वासन )
निवेदनाद्वारे दिला सल्ला
या निवेदनाद्वार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्रायलला सल्लाही दिला आहे. ते म्हणाले, रणनिती अशी असावी की, हमासला कमकुवत करेल, परंतु सामान्य नागरिकांचे नुकसान होणार नाही. गाझामध्ये राहणार्या नागरिकांना मदत दिली जावी.
ओबामांनी द्विराष्ट्रीय समाधानाचा पुनरुच्चार केला (इस्रायल आणि पॅलेस्टाइन स्वतंत्र देश असावेत). म्हणाले, इस्रायलला आपले अस्तित्व ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याचप्रमाणे पॅलेस्टाईनच्या जनतेलाही त्यांचे भविष्य ठरवण्याचा अधिकार आहे. त्यासाठी या प्रदेशातील नेत्यांना एकत्र आणावे लागेल आणि इस्रायललाही एक देश म्हणून अस्तित्वात राहण्याचा अधिकार आहे, हे त्यांना पटवून द्यावे लागेल. मात्र, आजची परिस्थिती पाहता भविष्यात शांतता प्रस्थापित होणे कठीण असल्याचे ओबामा यांनी मान्य केले.
ओबामा यांनी मुस्लिम, अरब आणि पॅलेस्टाईनचा विरोध चुकीचा असल्याचे सांगून ज्यूंविरुद्धच्या मोहिमेचा निषेधही केला. त्यांच्या मते गाझामधील लोकांविरुद्ध मानवेतर भाषा वापरणे चुकीचे आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष विधानाच्या शेवटी म्हणाले, जे चुकीचे आहे ते नष्ट केले पाहिजे असा नेहमी विचार करणे हा योग्य मार्ग नाही. त्यामुळे आदराने बोलणे योग्य ठरेल.
या निवेदनातील चार लेख वाचण्याचा सल्लाही ओमाबांनी दिला आहे. त्यांच्या मते यामुळे पार्श्वभूमी समजण्यास मदत होईल. यामध्ये ओबामा यांचे भाषण लेखक बेन रोड्स यांच्या ‘ए टाइमलाइन ऑफ द इस्त्रायल/पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट’ या लेखाचा समावेश आहे. तसेच न्यूयॉर्क टाइम्समधील थॉमस फ्रीडमन यांच्या दोन स्तंभ आणि लेखाचाही समावेश आहे.