Li Shangfu : चीनच्या संरक्षणमंत्र्यांची ४ महिन्यांत कोणतेही कारण न देता पदावरून हकालपट्टी

३ महिन्यांपासून बेपत्ता होते.

139
Li Shangfu : चीनच्या संरक्षणमंत्र्यांची कोणतेही कारण न देता पदावरून हकालपट्टी
Li Shangfu : चीनच्या संरक्षणमंत्र्यांची कोणतेही कारण न देता पदावरून हकालपट्टी

चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू (Li Shangfu) यांना अखेर पदावरून हटवण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यापासून ते कोणत्याही सार्वजनिक व्यासपीठावर दिसत नाहीत, मात्र त्यांना पदावरून का काढले, या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही.

‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ (SCMP)ने मंगळवारी सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेने शांगफू यांच्यावर काही निर्बंध लादले होते. ऑगस्टमध्ये ते शेवटचे सार्वजनिक व्यासपीठावर दिसले होते. नॅशनल पिपल्स कॉंग्रेसच्या स्थायी समितीने शांगफू यांना हटवले आहे. शांगफूंपूर्वी परराष्ट्र मंत्री कियान गेंग यांनाही जुलैमध्ये अशाच प्रकारे हटवण्यात आले होते. त्यांचे एका टीव्ही अँकेरसोबत अफेअरसोबत अफेअर असल्याची चर्चा होती.

(हेही वाचा – Rajnath Singh : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनच्या सीमेवर जवानांसोबत केले शस्त्रपूजन)

पदांवर बदलीची घोषणा नाही

या आठवड्याच्या शेवटी, अमेरिकन संरक्षण मंत्रालयाचे शिष्टमंडळ महत्त्वपूर्ण चर्चेसाठी बीजिंगला पोहोचले आहे. यापूर्वी शांगफू यांना हटवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. नवीन संरक्षण मंत्र्यांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. परराष्ट्र मंत्री गेंग यांना हटवल्यानंतर त्यांच्या जागी वांग यी यांना हे पद देण्यात आले. गेंग यांच्या आधी वांग हेच परराष्ट्र मंत्री होते आणि नंतर त्यांना राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे विशेष सल्लागार बनवण्यात आले. या दोन्ही मंत्र्यांना केवळ या पदावरूनच दूर केले नाही, तर त्यांचे समुपदेशक पदही काढून घेण्यात आले आहे. या पदांवर बदलीची घोषणाही झालेली नाही.

शांगफूंवर भ्रष्टाचाराचा आरोप…
– शांगफूंवर भ्रष्टाचाराचा आरोप असल्याची चर्चा महिनाभरापूर्वी रॉयटर्स या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली होती. शांगफूंना सध्या शस्त्रास्र खरेदीशी संबंधित चौकशी सामोरे जावे लागत आहे.

– अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने एका चिनी अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले होते की, संरक्षण मंत्र्यांची बऱ्याच काळापासून चौकशी केली जात आहे आणि त्यांना अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आले आहे. शांगफूंना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा दावाही करण्यात आला होता. 29 ऑगस्ट रोजी बीजिंगमध्ये आफ्रिकन देशांसोबत सुरक्षा मंचावर भाषण देताना ते अखेरचे दिसले होते. त्या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी रशिया आणि बेलारूसलाही भेट दिली.

– जुलैमध्ये चीनच्या संरक्षण मंत्रालयातील शस्त्रास्त्र खरेदी युनिटने नोटीस जारी केली होती. यामध्ये शस्त्र खरेदीच्या निविदा प्रक्रियेतील अनियमितता दूर करण्याबाबत बोलले गेले. युनिटने सार्वजनिकपणे एक अहवाल मागवला होता ज्यामध्ये चुकांशी संबंधित पुरावे असतील. हा अहवाल ऑक्टोबर 2017 च्या सुमारास मागवण्यात आला होता. त्यावेळी ली शांगफू हे शस्त्र खरेदी विभागाचे प्रमुख होते. ऑक्टोबर 2022 पर्यंत ते या पदावर होते. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, या युनिटच्या आणखी 8 अधिकाऱ्यांची नावेही तपासात समाविष्ट आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.