Manoj Jarange Patil : सरकारची मुदत संपली; मनोज जरांगेंचे आजपासून पुन्हा उपोषण

मी अन्न-पाणी घेणार नाही, औषधे घेणार नाही. गावात कुणी आले, तर त्यांना शांततेत माघारी पाठवा, असे आवाहन जरांगे यांनी गावकऱ्यांना केले आहे.

217
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचे आजपासून पुन्हा उपोषण; सरकारवर केले आरोप
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचे आजपासून पुन्हा उपोषण; सरकारवर केले आरोप

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. (Manoj Jarange Patil) त्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारला दिलेला वेळ संपल्याने जरांगे यांनी उपोषणाची भूमिका ठाम ठेवली आहे. आजपासून मी उपोषणाला बसत आहे. सरकार आमच्या वेदना समजेल, अशी आशा होती; पण सरकार दिशाभूल करत आहे. सरकारला दिलेला 40 दिवसांचा अल्टिमेट संपला, 41 वा दिवस उजाडला तरी, सरकार मराठा आरक्षणासाठी कोणतीही भूमिका घेत नाही, असे जरांगे यांनी म्हटले आहे. (Manoj Jarange Patil)

(हेही वाचा – Afghanistan’s Win Over Pakistan : अफगाणिस्तानच्या पाकिस्तानवरील विजयात ‘या’ भारतीयाचा आहे हातभार )

सरकार दिशाभूल करत आहे

मी अन्न-पाणी घेणार नाही, औषधे घेणार नाही. गावात कुणी आले, तर त्यांना शांततेत माघारी पाठवा, असे आवाहन जरांगे यांनी गावकऱ्यांना केले आहे. उग्र आंदोलन करू नका, आंदोलन शांततेने करा, आत्महत्या करू नका, असेही जरांगे यांनी म्हटले आहे. सरकार आमच्या वेदना समजेल अशी आशा होती, पण सरकार दिशाभूल करत आहे. सरकारला दिलेला 40 दिवसांचा अल्टिमेटम संपला, 41 दिवस उजाडला तरी, सरकार आरक्षणासाठी कोणतीही भूमिका घेत नाही, त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत उपोषण करणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. (Manoj Jarange Patil)

सरकार आणि मुख्यमंत्री यांचा आणि सर्व पक्षांचा सन्मान घेऊन, त्यांनी (पक्षांनी) सर्वांनी मिळून ठराव घेऊन, आम्ही 40 दिवस दिले. सरकारकडून कालपर्यंत आशा होती मात्र, सरकारकडून आणि सर्वच पक्षांकडून झाले नाही, त्यामुळे आज आमरण उपोषण सुरू केले आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.  (Manoj Jarange Patil)

यावेळी मनोज जरांगेंनी आरक्षणासोबतच सरकारकडे काही मागण्याही केल्या. मनोज जरांगे म्हणाले, सारथीच्या विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहे. ती मुले आंदोलन करत आहेत. कृपया त्यांचे प्रश्न सोडवा. मागे आंदोलनामुळे आंतरवाली सराटीतील आजुबाजूच्या गावातील काही शेतीचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करुन तातडीने भरपाई द्या. मराठा आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घ्या, असे जरांगे पाटील म्हणाले.  (Manoj Jarange Patil)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.