Crime : मुंबई पोलिसांची सरकारी टोइंग व्हॅन चोरीला; सापडली कसारा पोलीस ठाण्यात

103
Crime : मुंबई पोलिसांची सरकारी टोइंग व्हॅन चोरीला; सापडली कसारा पोलीस ठाण्यात
Crime : मुंबई पोलिसांची सरकारी टोइंग व्हॅन चोरीला; सापडली कसारा पोलीस ठाण्यात
मुंबई पोलिसांच्या वाहतुक विभागाची चोरीला (Crime) गेलेली सरकारी टोइंग व्हॅन (Towing Van) ठाणे ग्रामीण  (Thane rural) पोलिसांच्या कसारा पोलीस ठाण्यात मिळून आली आहे. टोइंग व्हॅन चोरी करून नाशिकच्या दिशेने जात असताना कसारा येथे या टोइंग व्हॅनला अपघात झाला आणि कसारा पोलिसांनी चालकासह अपघातग्रस्त टोइंग व्हॅन पोलीस ठाण्यात जमा केली होती.
मुंबई वाहतूक विभागाच्या वडाळा वाहतूक पोलिसांकडे असलेली सरकारी टोइंग व्हॅन दोन दिवसांपूर्वी पूर्व मुक्त मार्गावरील (eastern freeway) राम चौकी रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती. ही टोइंग व्हॅन पूर्व मुक्त मार्गावरील अपघातग्रस्त वाहनांना रस्त्यातून बाजूला करून किंवा अपघातग्रस्त वाहनांना पोलीस ठाण्यात जमा करण्यासाठी वापर केला जातो. दोन दिवसांपूर्वी सरकारी टोइंग व्हॅन अचानक रस्त्याच्या कडेपासून बेपत्ता झाली होती.
(हेही वाचा-Manoj Jarange Patil : …त्यापासून मुख्यमंत्र्यांना कोणीतरी अडवत आहे; जरांगे पाटील यांचा आरोप)

वाहतूक पोलिसांनी या सरकारी टोइंग व्हॅनचा परिसरात शोध घेतला ती मिळून न आल्यामुळे वाहतूक पोलिसांनी शिवडी पोलीस ठाण्यात (Crime) अज्ञात व्यक्तिविरुद्ध चोरीची तक्रार दाखल केली, शिवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला होता.

दरम्यान कसारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका टोइंग व्हॅनचा अपघात झाल्याची माहिती शिवडी पोलिसांना मिळताच पोलीस पथक कसारा पोलीस ठाण्यात दाखल झाले, त्या ठिकाणी वडाळा येथून चोरीला गेलेली पोलिसांची टोइंग व्हॅन आढळून आली. अधिक तपासात मोनू पंडित उपाध्याय याने ही टोइंग व्हॅन चोरी (Crime) करून नाशिकच्या दिशेने जात असताना कसारा येथे या टोइंग व्हॅनला अपघात झाला. शिवडी पोलिसांनी टोइंग व्हॅन चोराला कसारा पोलिसांच्या ताब्यातून घेऊन अटक केली. उपाध्याय हा मूळचा मध्यप्रदेश राज्यातील असून तो ही टोइंग व्हॅन व्यवसायिक कामासाठी चोरी करून मध्यप्रदेश राज्यात निघाला होता अशी माहिती तपासात समोर आली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.