Scientific Honor : भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांना अमेरिकेचा सर्वोच्च पुरस्कार !

141
Scientific Honor : भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांना अमेरिकेचा सर्वोच्च पुरस्कार !
Scientific Honor : भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांना अमेरिकेचा सर्वोच्च पुरस्कार !

भारतीय वंशाच्या दोन शास्त्रज्ञांना युनायटेड स्टेट्समधील तांत्रिक कामगिरीबद्दल सर्वोच्च सन्मान, नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन (Scientific Honor) प्रदान करण्यात आला.

अशोक गाडगीळ आणि सुब्रा सुरेश, अशी या दोन भारतीय शास्त्रज्ञांची नावे आहेत. यांना अमेरिकन शास्रज्ञांनी नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार युनायटेड स्टेटसमधील तांत्रिक कामगिरीचा सर्वोच्च सन्मान आहे.

(हेही वाचा – India GDP : ‘२०३० पर्यंत भारत जपानला मागे टाकून जीडीपीच्या निकषावर  तिसऱ्या क्रमांकावर असेल’)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मंगळवारी अशोक गाडगीळ आणि सुरेश यांना ही पदके प्रदान केली. यामध्ये १२ वैज्ञानिकांपैकी अशोक गाडगीळ यांनी पिण्याच्या पाण्याचं तंत्रज्ञान, पर्यावरण संरक्षण, विद्युत रोषणाई यासह विकसनशील जगातील गुंतागुंतीच्या अनेक विषयावर संशोधन केलं आहे. सध्या कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथे प्राध्यापक म्हणून काम करणारे आणि लॉरेन्स बर्कले नॅशनल लॅबोरेटरीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ असलेले गाडगीळ हे शाश्वत विकासाच्या क्षेत्रातील एक प्रसिद्ध संशोधक आहेत. विकसनशील देशांमध्ये स्वच्छ पाणी, ऊर्जा कार्यक्षमता आणि स्वच्छता सुधारण्यासाठी प्रभावी तंत्रज्ञान विकसित करणाऱ्यावर त्यांचे कार्य केंद्रित आहे.

सुब्रा सुरेश हे भारतीय वंशाच्या अमेरिकन बायोइंजिनियर, साहित्य शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक, प्रोफेसर एमेरिटस आणि मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे माजी डीन आहेत. एमआयटीमधील पाचपैकी कोणत्याही शाळांचे नेतृत्व करणारे ते पहिले आशियाई वंशाचे प्राध्यापक आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.