-
ऋजुता लुकतुके
एलॉन मस्क येणाऱ्या दिवसांत ट्विटरवर एखादी पोस्ट लाईक करण्यासाठीही पैसे घेणार अशीच चिन्हं आहेत. सगळ्यात आधी हा प्रयोग फिलिपिन्स आणि न्यूझीलंडमध्ये सुरू होणार आहे. ट्विटर ही सोशल मीडिया साईट न्यूझीलंड आणि फिलिपिन्स या देशात लवकरच नवीन ग्राहक नोंदणी सेवा सुरू करणार आहे. या अंतर्गत किमान खातं सुरू ठेवण्यासाठी ट्विटरच्या ग्राहकांना ८४ रुपये वर्षाला द्यावे लागतील. या सेवे अंतर्गत तुम्ही किमान संदेश आणि दुसऱ्यांची पोस्ट लाईक करणं तसंच ती रिपोस्ट करणं असा सुविधा वापरू शकाल. म्हणजेच आता या मूलभूत सेवांसाठीही तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. (Twitter To Charge For Likes?)
Starting today, we’re testing a new program (Not A Bot) in New Zealand and the Philippines. New, unverified accounts will be required to sign up for a $1 annual subscription to be able to post & interact with other posts. Within this test, existing users are not affected.
This…
— Support (@Support) October 17, 2023
या सगळ्यात लहान प्लॅनसाठी ट्विटरने ‘नॉट अ बॉट’ असं नाव ठेवलं आहे. ट्विटरवरील फेक अकाऊंट बंद व्हावी आणि स्पॅमिंग कमी व्हावं यासाठी हा उपाय करत असल्याचं एलॉन मस्क यांनी म्हटलं आहे. अर्थात, हा नवीन बदल ट्विटरच्या आधीच्या ग्राहकांना लागू होणार नाही. तर नव्यानं खातं सुरू करताना तुम्हाला प्लॅन विचारण्यात येईल. (Twitter To Charge For Likes?)
(हेही वाचा – IT Pay Hike : एचसीएल टेक आणि इन्फोसिस दिवाळीनंतर देणार कर्मचाऱ्यांना पगार वाढ)
ट्विटर कंपनीने ट्विट करून १८ ऑक्टोबरलाच या सेवेविषयीची माहिती दिली होती आणि यात स्पॅमिंग टाळण्यासाठी हे करत असल्याचं म्हटलं होतं. ‘आम्ही न्यूझीलंड आणि फिलिपिन्समध्ये नॉट अ बॉट ही नवीन मोहीम सुरू करत आहोत. यात नवीन ग्राहकांना दरवर्षी १ डॉलर इतकं शुल्क भरावं लागेल. यामुळे ट्विटरवरील फेक खाती तसंच स्पॅमिंग कमी होतं का हे आम्हाला बघायचं आहे. स्पॅमिंग आणि फेक अकाऊंटमुळे ट्विटरची कार्यक्षमता कमी होत असते. तेच टाळण्यासाठी ही प्रायोगिक तत्त्वावर केलेली उपाययोजना आहे,’ असं ट्विटरने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. (Twitter To Charge For Likes?)
या दोन देशांमध्ये नवीन खातं उघडताना आधी तुमची प्राथमिक माहिती विचारली जाईल. तिथे तुम्हाला ईमेल आणि फोन क्रमांक द्यावा लागेल आणि त्यानंतर यु आर नॉट बॉट अंतर्गत तुम्हाला प्लॅन निवडावा लागेल आणि यात कमीत कमी प्लॅन आहे तो १ अमेरिकन डॉलरचा. त्याशिवाय तुम्हाला ट्विटर खातं वापरता येणार नाही. कारण, पोस्ट करणं किंवा इतरांची पोस्ट लाईक करणं किंवा ती रिपोस्ट करणं यासाठीही आता नॉट अ बॉट प्लान घ्यावा लागेल. दोन देशांमघील या प्रयोगानंतर इतर देशांमध्येही ट्विटरला असाच प्लॅन सुरू करायचा आहे. (Twitter To Charge For Likes?)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community