मुंबई विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये (Sports Competition) मुरबाडच्या महाराष्ट्र मिलिटरी शाळेने उत्तम कामगिरी केली. जिल्हा क्रिडाधिकारी ठाणे यांनी आयोजित केलेल्या रायफल / पिस्तुल शुटिंग स्पर्धेमध्ये (Rifle Shooting Competition) महाराष्ट्र मिलिटरी स्कूल मुरबाडच्या (वयोगट १७/१९ वर्षांखालील संघामधून सहभागी झालेल्या भूमीत भुरे, नरेंद्र काबाडी, आर्यन गोले, सोहम सावंत या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय शुटिंग स्पर्धेत निवड करण्यात आली.
जिल्हा क्रिडाधिकारी, मुंबई यांनी कर्नाळा स्पोर्ट्स क्लब पनवेल येथील रायफल शुटिंग क्लबमध्ये रविवार, दिनांक २२/१०/२३ रोजी आयोजित विभागस्तरीय रायफल / पिस्तुल शुटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमधून सहभागी झालेल्या महाराष्ट्र मिलिटरी स्कूल, मुरबाडच्या विद्यार्थ्यांनी दमदार खेळी करून पुन्हा एकदा विभागस्तरीय स्पर्धांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यासाठी शाळेचे रायफल व पिस्तुल खेळाचे प्रशिक्षक संदेश गपाट यांनी अल्पावधीत सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी करून घेतली होती. महाराष्ट्र मिलिटरी स्कूल, मुरबाडच्या संघाने मिळवलेल्या यशाबद्दल शाळेचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.
(हेही वाचा – Scientific Honor : भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांना अमेरिकेचा सर्वोच्च पुरस्कार ! )
स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीचे अध्यक्ष माननीय सूर्यकांत पाटील, कार्यवाह रणजित सावरकर, कोषाध्यक्ष सुरेश जाधव, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेचे प्राचार्य काशिनाथ भोईर, हॉकी प्रशिक्षक राजेंद्र तिवारी, क्रीडा विभागातील प्रशिक्षक, सर्व शिक्षक आणि कर्मचारी वर्गाकडून विजयी संघाचे अभिनंदन करण्यात आले.
Join Our WhatsApp Community