माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (Malegaon Sugar Factory ) गळीत हंगाम शुभारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार आल्यास तीव्र आंदोलन (strong agitation) छेडले जाईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून (Maratha Kranti Morcha) देण्यात आला आहे. हा गळीत हंगाम शुभारंभ शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यासंदर्भातील निवेदन मराठा क्रांती मोर्चाने माळेगाव पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना निवेदन दिले आहे.
मराठा क्रांती मोर्चाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत राजकीय व्यक्तिंना राज्यात ठिकठिकाणी गावबंदी करण्यात आलेली आहे. असे असूनही माळेगाव कारखान्याने शनिवारी अजित पवार यांच्या हस्ते गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. राजकीय नेत्यांच्या हस्ते हा कार्यक्रम घेऊ नये, अशी मागणी कारखाना व्यवस्थापनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तसेच राजकीय व्यक्तिंच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ केल्यास मराठा समाजाकडून आंदोलन छेडण्यात येईल, त्याची जबाबदारी कारखान्यावर राहिल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
(हेही वाचा – Maratha Reservation : बीड मध्ये मराठा तरुणाची आत्महत्या)