Lalit Patil : ललितने एकट्या मुंबईत २५० किलो एमडीचा केला पुरवठा, विद्यार्थ्यांना एमडी पुरवणाऱ्याची दिली नावे

122
Lalit Patil : ललितने एकट्या मुंबईत २५० किलो एमडीचा केला पुरवठा, विद्यार्थ्यांना एमडी पुरवणाऱ्याची दिली नावे
Lalit Patil : ललितने एकट्या मुंबईत २५० किलो एमडीचा केला पुरवठा, विद्यार्थ्यांना एमडी पुरवणाऱ्याची दिली नावे

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अमली पदार्थ पुरवणाऱ्या ड्रग्स विक्रेत्यांची माहिती आणि नावे ड्रग्स माफिया ललित पाटील याने पोलिसांना दिली असल्याचे सूत्रांकडून समजते. तसेच त्याने नाशिकच्या फक्ट्रीमधून एकट्या मुंबईत आतापर्यंत २५० किलो एमडी या अमली पदार्थाचा पुरवठा केल्याचे समोर येत आहे. परंतु पाटील सांगत असलेली सर्व माहिती खरी आहे का? या बाबत तपास यंत्रणेकडून तपासले जात आहे. न्यायालयीन कोठडीत असताना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल झालेल्या ललित पाटील याने रुग्णालयातून पळ काढल्यानंतर तो मुंबई पोलिसांच्या हाती लागला. (Lalit Patil)

साकीनाका पोलिसांनी ललित पाटील याला बंगळुरू येथून ताब्यात घेऊन ३०० कोटींच्या एमडी ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे. या प्रकरणात साकीनाका पोलिसांनी यापूर्वी १४ जणांना अटक केली होती. ललित पाटील याचे या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले असून, ललित पाटील हा या प्रकरणातील १५ तर त्याचा वाहन चालक सचिन वाघ हा १६ वा आरोपी आहे. सोमवारी पाटील व त्यांच्या सहआरोपींचे अंधेरी न्यायालयाकडून दुसरे रिमांड घेण्यात आले असून न्यायालयाने त्यांना २७ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (Lalit Patil)

(हेही वाचा – Malegaon Sugar Factory : अजित पवारांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ केल्यास मराठा क्रांती मोर्चाकडून तीव्र आंदोलनाचा इशारा)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साकीनाका पोलिसांना ड्रग्ज रॅकेटमध्ये कोणतेही राजकीय कनेक्शन सापडलेले नसले तरी पाटीलने मात्र मुंबईतील अनेक ड्रग्ज तस्करांची नावे उघड केली आहे. हे ड्रग्स तस्कर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि बड्या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स सप्लाय करतात याची इत्यंभूत माहिती पाटील याने दिल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. तसेच त्याने नाशिकच्या फॅक्ट्रीमधून एकट्या मुंबईत जवळपास २५० किलोचा एमडी या अमली पदार्थांचा पुरवठा केल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणा ललित पाटीलने दिलेल्या माहितीची खात्री करण्यात येत असून त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्राचे म्हणणे आहे. (Lalit Patil)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.