Israel-Hamas Conflict : इस्त्रायलकडून संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांच्या राजीनाम्याची मागणी

संयुक्त राष्ट्रांचे इस्रायली राजदूत गिलाद एरदान यांनी ही मागणी केली आहे.

130
Israel-Hamas Conflict : इस्त्रायलकडून संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांच्या राजीनाम्याची मागणी
Israel-Hamas Conflict : इस्त्रायलकडून संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांच्या राजीनाम्याची मागणी

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटीनओ गुटेरेस (Anteno Gutierrez) यांच्या राजीनाम्याची मागणी इस्त्रायलकडून करण्यात आली आहे. हमासने ७ ऑक्टोबरला केलेला हल्ला अचानक झालेला नव्हता, असे म्हणत X अकाउंटद्वारे या राजीनाम्याची मागणी केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे इस्रायली राजदूत गिलाद एरदान यांनी ही मागणी केली आहे.

इस्त्रायलने गाझामधील कारवाईवर केलेल्या वक्तव्यावरून संयुक्त राष्ट्र प्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी करत सोशल मिडिया X अकाउंटवरून म्हटले आहे की, ‘या पदावर असलेल्या व्यक्तिने लहान मुले, महिला आणि वृद्ध व्यक्ती यांच्या होत असलेल्या सामूहिक हत्येमुळे अँटीनओ गुटेरेस त्यांच्या पदावर राहण्यास योग्य नाहीत. ते संयुक्त राष्ट्राचे नेतृत्व करण्यास योग्य नाहीत. मी त्यांना त्वरित राजीनामा देण्याचे आवाहन करतो. इस्त्रायलच्या नागरिकांवर आणि ज्यू लोकांवर झालेल्या सर्वात भयंकर अत्याचाराबद्दल सहानुभूती दाखवणाऱ्यांशी बोलण्यात काही औचित्त्य किंवा मुद्दा नाही किंवा माझ्याकडे कोणतेही शब्द नाहीत,’

(हेही वाचा – Agriculture News : १३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना मिळणार ‘पी एम किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेचा लाभ)

इस्रायली राजदूत गिलाद एरदान यापुढे सांगतात की, X अकाउंटवरील या टिपणीने सिद्ध होते की, संयुक्त राष्ट्र इस्त्रायलच्या वास्तविकतेपासून पूर्णपणे अनभिज्ञ आहे. त्यांचं हे विधान हा हल्ला अचानक नव्हता हे आतंकवाद आणि हत्यांना सहानुभूती देणारं आहे. कोणत्याही संघटनेच्या प्रमुखांनी असा एकांगी विचार करावा, हे भयावह आहे.

पॅलेस्टिनी लोकांना 56 वर्षांपासून गुदमरल्यासारखे व्यवसाय सहन करावे लागले आहे. त्यांनी आपली जमीन वस्त्यांमुळे आणि हिंसेने ग्रासलेली पाहिली आहे; त्यांची अर्थव्यवस्था खुंटली; त्यांचे लोक विस्थापित झाले आणि त्यांची घरे उध्वस्त झाली. त्यांच्या दुर्दशेवर राजकीय तोडगा काढण्याच्या त्यांच्या आशा मावळत चालल्या आहेत, असे संयुक्त राष्ट्र प्रमुख महासभेत म्हणाले. त्यांनी मंगळवारी गाझा पट्टीवर होत असलेल्या गोळीबाराबद्दल चिंता व्यक्त केली होती तसेच गाझामधील जनता मूलभूत गरजांसाठी झगडत असताना दोन्ही बाजूंची युद्धविराम गरजेचा असल्याचंही सांगितलं होतं

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.