Rahul Dravid Trekking & Ice-Dip : आठवड्या भराच्या सुटीत भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड नेमकं करतायत काय?

भारतीय संघाला मिळालेल्या सात दिवसांच्या सुटीत खेळाडू आपल्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालवतायत. तर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ट्रेकिंगचा आनंद लुटत आहेत. 

150
Rahul Dravid Trekking & Ice-Dip : आठवड्या भराच्या सुटीत भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड नेमकं करतायत काय?
Rahul Dravid Trekking & Ice-Dip : आठवड्या भराच्या सुटीत भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड नेमकं करतायत काय?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाला मिळालेल्या सात दिवसांच्या सुटीत खेळाडू आपल्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालवतायत. तर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ट्रेकिंगचा आनंद लुटत आहेत. भारतीय संघाने या विश्वचषक स्पर्धेत पाच पैकी पाच सामन्यांत विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे आणि संघाचे निम्म्याच्या वर साखळी सामने पूर्ण झाल्यामुळे भारतीय संघाने उपान्त्य फेरी गाठल्यात जमा आहे आणि त्यातच न्यूझीलंड विरुद्धच्या कठीण सामन्यानंतर भारताला सात दिवसांची विश्रांती मिळाली आहे. (Rahul Dravid Trekking & Ice-Dip)

या सुटीत बहुतेक खेळाडू आपल्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालवण्यासाठी आपापल्या घरी परतले आहेत. तर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड धरमशाला इथं सुटी घालवून लखनौमध्ये खेळाडूंबरोबर दाखल होणार आहेत. मागच्या दोन दिवसांत राहुल यांनी काही थरारक अनुभवही घेतले आहेत. (Rahul Dravid Trekking & Ice-Dip)

बुधवारी राहुल द्रविड यांनी आपल्या काही साथीदारांबरोबर हिमालयातील बर्फा इतक्या थंड नदीत डुंबण्याचा आनंद लुटला. तेव्हाचे त्यांचे फोटो संघातील एक खेळाडू के एल राहुलने ट्विटरवर शेअर केले आहेत. यात के एल राहुल आणि राहुल द्रविड यांच्याबरोबर फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड आणि सपोर्ट स्टाफमधील आणखी एक सहकारी दिसत आहे. (Rahul Dravid Trekking & Ice-Dip)

या फोटोंमध्ये राहुल द्रविड सगळ्यात कूल दिसत असल्याच्या प्रतिक्रियाही काही लोकांनी दिल्या आहेत. के एल राहुलने या मोहिमेला आईस-डिप इन हिमालया असं नाव दिलं आहे. (Rahul Dravid Trekking & Ice-Dip)

(हेही वाचा – Online Services: पुण्यात ओला, उबर, स्विगी, झोमॅटो, अर्बन कंपनीची ऑनलाईन सेवा दिवसभर बंद)

इतकंच नाही तर मंगळवारी भारताचा सपोर्ट स्टाफ मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली एका अवघड ट्रेकलाही जाऊन आला. तो व्हीडिओ बीसीसीआयने ट्विट केला आहे. यात राहुल द्रविड आपल्या संघ साथीदारांची आठवण काढताना दिसतायत. आणि त्याचवेळी हिमालयाच्या सौंदर्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. (Rahul Dravid Trekking & Ice-Dip)

‘विश्वचषकासारखी स्पर्धा सुरू असताना संघातील खेळाडूंना इथं आणता येणार नाही. पण, ते असते तर मजा आली असती. अवघड रस्ता चढून आल्यावर इथून जो नजारा दिसतो, तो अवर्णनीय आहे,’ असं या व्हीडिओत राहुल द्रविड म्हणताना दिसतात. (Rahul Dravid Trekking & Ice-Dip)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.