-
ऋजुता लुकतुके
पाक कर्णधार बाबर आझम खराब कामगिरीमुळे आयसीसी एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत आपलं पहिलं स्थान गमावण्याच्या बेतात आहे आणि भारतीय सलामीवीर शुभमन त्याला मागे टाकू शकतो. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर सध्या दुहेरी दडपण आहे. एकतर पाक संघ विश्वचषकात मनासारखी कामगिरी करत नाहीए. अफगाणिस्तान विरुद्धही संघाचा पराभव झालाय आणि त्यातच त्याची फलंदाजीही धड होत नाहीए. मागच्या ५ सामन्यांत मिळून बाबरने १५७ धावा केल्या आहेत. (Shubman Gill Record)
त्यामुळे आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत बाबर आझमने ८२९ रेटिंग गुण गमावले आहेत आणि विश्वचषकात भन्नाट कामगिरी करणारे क्विंटन डी कॉक, विराट कोहली, रोहीत शर्मा आणि खुद्द पाक संघातील महम्मद रिझवान हे खेळाडू रेटिंग गुण कमावत बाबरला मागे टाकण्याच्या तयारीत आहेत. (Shubman Gill Record)
पण, या सगळ्यात पुढे आहे तो भारताचा शुभमन गिल. खरंतर विश्वचषकात पहिले दोन सामने डेंग्यू झाल्यामुळे तो खेळू शकला नव्हता. आणि त्यानंतर जे तीन सामने तो खेळला यात त्याने बांगलादेश विरुद्ध ५३ धावांसह ९५ धावा केल्या आहेत. त्याच्या तुलनेत रोहीत शर्मा, विराट कोहली आणि क्विंटन डी कॉक या खेळाडूंनी ३५० धावांच्या वर मजल मारली आहे. (Shubman Gill Record)
पण, शुभमन गिलचं या वर्षभरातील सातत्य त्याच्या कामी आलं आहे. या हंगामात गिलने २३ सामन्यांमध्ये १,३२५ धावा केल्या आहेत त्या ६६.२५ च्या सरासरीने आणि यात त्याने ५ शतकं झळकावली आहेत. २०८ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. (Shubman Gill Record)
या त्याच्या कामगिरीमुळे शुभमन गिल आयसीसी क्रमवारीतही सगळ्यांना मागे टाकण्याच्या तयारीत आहे. फक्त शुभमन गिलच नाही तर विश्वचषक स्पर्धेतील क्विंटन डी कॉक, विराट कोहली आणि न्यूझीलंडचा डेरिल मिचेल यांनीही क्रमवारीत मुसंडी घेतली आहे. या घडीला आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतील पहिले ५ फलंदाज पाहूया. (Shubman Gill Record)
(हेही वाचा – Lalit Patil : ललितने एकट्या मुंबईत २५० किलो एमडीचा केला पुरवठा, विद्यार्थ्यांना एमडी पुरवणाऱ्याची दिली नावे)
डेव्हिड वॉर्नर बरोबर विराट कोहलीही ७४८ गुणांसह संयुक्त पाचव्या स्थानावर आहे. विश्वचषकातील कामगिरीनंतर विराट तीन स्थानं वर चढला आहे. तर क्विंटन डी कॉकचे रेटिंग गुणही मागच्या दोन सामन्यातील शतकी खेळींनंतर वाढले आहेत. आणि तो ही तीन स्थानांनी वर आला आहे. तर त्याचा संघ साथीदार क्लासेनची चार स्थानांनी प्रगती झाली आहे. (Shubman Gill Record)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community