कोविडमुळे मृत्यू पावलेल्या २८२ महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपैंकी तब्बल २१५ कर्मचाऱ्यांच्या वारसांना महापालिकेच्यावतीने ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदानाचे सहाय्य देण्यात आले आहे. त्यातील २७ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांचे दावेच अपात्र ठरले आहे. तर १७ दावे हे प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेने आतापर्यंत २१५ मृत कर्मचारी तथा कामगारांच्या वारसांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदतीची रक्कम अदा केली असून अशा विविध कारणांमुळे २७ कामगारांच्या वारसांचे दावेच अपात्र ठरल्याने ते या सानुग्रह अनुदानाच्या आर्थिक रकमेपासूनच वंचित राहिल्याचे दिसून येत आहे. (Covid Death)
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज योजनेसंदर्भात कोविड १९ च्या रुग्णांची प्रत्यक्ष सेवा करणाऱ्या तसेच त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या कोविड १९ संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू पावलेल्य आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण लागू करण्याचे आदेश केंद्र शासनाकडून राज्य शासनाला देण्यात आले. त्यानुसार राज्याच्या वित्त विभागाने २९ मे २०२० रोजी सानुग्रह सहाय्याची योजना सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व राजय शासकीय सार्वजनिक उपक्रम योज्याकडून राबवण्यात येईल असे निर्देश दिले. त्यानुसार कोरोनाच्या सार्वत्रिक साथीमध्ये सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार व मदत कार्य या कार्यवाहीशी संबंधित कर्तव्यावर कार्यरत महानगरपालिकेतील विविध प्रवर्गातील कामगार तथा कर्मचारी आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगार/बाह्य स्त्रोतांद्वारे घेतलेले, रोजंदारी, तदर्थ, मानसेवी कामगार, कर्मचारी ज्यांचा कोरोना विषाणूशी जवळून संबध येत आहे, त्यांचा कोविड-१९ मुळे मृत्यू झाल्यास ०८. जून २०२० मधील नमूद अटींच्या अधीन राहून ५० लाख रकमेचे सानुग्रह सहाय्य त्यांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेतला होता. (Covid Death)
२०२२ पर्यंत कोविडमुळे महापालिकेच्या एकूण २८२ कामगार, कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यातील आजमितीस २४ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना केंद्र सरकारच्या परिपत्रकानुसार मंजूर केलेले ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय अनुदान देण्यात आले. तर उर्वरीत कर्मचाऱ्यांपैंकी २१४ मृत कामगारांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य अनुदान देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशाच्या अनुषंगाने कोविड-१९ मुळे मृत्यू पावलेल्या सर्व कर्मचायांचे दावे प्रथम केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या राज्य शासनाच्या पुण्यातील आरोग्य सेवा संचालनालयाकडे पाठविण्यात येत होते. त्यामुळे त्याठिकाणी नाकारलेल्या दाव्यांमध्ये महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांना ही सानुग्रह सहाय्य अनुदानाची रक्कम अदा केली असून आतापर्यंत सुमारे १०८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
(हेही वाचा : Kurla-Kalina Mithi River Bridge : कुर्ला-कलिना रस्त्यावरील मिठी नदी पूल : खर्चही वाढला दुपटीने)
महापालिकेच्या या मृत कामगारांपैकी २७ कामगारांच्या वारसांचे दावे हे अपात्र ठरले आहेत. ज्यामध्ये प्रयोगशाळेचे अहवाल, पुरेशी आवश्यक कागदपत्रे सादर न करणे, अविवाहित कामगारांचे रक्ताच्या नाते असलेले वारसदार नसणे, कुटुंब संज्ञेत असलेले वारसदार नसणे आदींचा समावेश असून यामध्ये कोविड होण्यापूर्वी किंवा मृत्यू पूर्वी ते १४ दिवस अधी ते सेवेत कार्यरत असणे अशाप्रकारच्या अटींची पूर्तता न झाल्याने हे कामगारांच्या वारसांचे दावे अपात्र ठरल्याचे विभागाचे म्हणणे आहे. तसेच प्रयोगशाळेचा अहवाल नसला तरी इतर कागदपत्रांच्या आधारे त्यांना याचा लाभ देण्याचा प्रयत्न केला गेला. यासाठी नेमलेल्या समितीपुढे यासर्वांचे दावे मंजुरीला पाठवले जातात आणि त्यांच्या मंजुरीनंतरच हे दावे मंजूर केले जातात,असे विभागाचे म्हणणे आहे.
कोविडमुळे मृत्यू पावलेले कामगार,कर्मचारी अधिकारी : २८२
केंद्राने निकालात निघालेले दावे : २४
महापालिकेचे मंजूर केलेले सानुग्रह अनुदान : २१४
अपात्र ठरलेले दावे : २७
प्रलंबित राहिलेले दावे : १७
हेही पहा –
Join Our WhatsApp Community