चहा हे जगभरातील लाखो लोकांचे आवडणारे पेय आहे. विविध फ्लेवर्स (health-tips) आणि प्रकारांमध्ये येणारा चहा प्यायल्याने शरीराला फायदेदेखील होतात. बहुतांश लोकांची सकाळची सुरुवात गरम गरम कपभर चहा पिऊन होते. रिकाम्या पोटी चहा पिणे ही सवय, आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.
पित्त आणि अपचन
रिकाम्यापोटी चहा प्यायल्याने पित्ताचे प्रमाण वाढते. चहामध्ये टॅनिन्स आणि कॅटेचिन यासारखी तत्त्वे असल्यामुळे चहा नैसर्गिकरित्या आम्लयुक्त असतो. काहीही न खाता चहा प्यायल्यास पोटाच्या आतड्यांना त्रास होण्याची शक्यता असते तसेच अस्वस्थता, ऍसिड रिफ्लक्स आणि अगदी जठराची सूज असे त्रासदेखील होऊ शकतात.
पोषक तत्त्वांचा अपुरा पुरवठा
रिकाम्या पोटी चहाचे सेवन केल्यावर शरीराला पोषक तत्त्वांचा पुरवठा कमी प्रमाणात होतो. त्यामुळे शरीरात लोहाची कमतरता, अशक्तपणा, हाडे कमकुवत होणे, दात ठिसूळ होणे अशा प्रकारचे त्रास होण्याची शक्यता असते.
(हेही वाचा – Hardik Pandya Injury Update : हार्दिक इंग्लंड विरुद्ध तरी खेळेल का? संघाकडून मोठा अपडेट)
चयापचयावर परिणाम
चहा, कॉफी या पेयांमध्ये कॅफिन असते. त्यामुळे कोणताही अन्नपदार्थ खाल्ल्याशिवाय किंवा उपाशीपोटी चहा प्यायल्यास पोटात हायड्रोक्लोरिक ऍसिड जास्त प्रमाणात निर्माण होऊ शकतो. यामुळे पचनाचे विकार जडू शकतात तसेच रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो.
निर्जलीकरणाचा धोका वाढतो
चहा, कॉफी काहीही न खाता घेतल्याने लघवीचे प्रमाण वाढते. रिकाम्यापोटी चहा घेतल्याने निर्जलीकरणाचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळच्या कपभर गरम चहामुळे दिवसाची सुरुवात उत्साहवर्धक झाली, तरी शरीरात निर्जलीकरणाचा त्रास होण्याची शक्यता असते याशिवाय यामुळे मळमळ होणे, उलटीसारखे वाटणे, अशा प्रकारचेही त्रास होऊ शकतात. त्यामुळे रिकाम्यापोटी चहा घेऊ नये, असे आहारतज्ज्ञ सांगतात.