अयोध्येतील राममंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Lord Ram’s Idol) केली जाईल. बुधवारी, २५ ऑक्टोबरला श्री राम जन्मभूमी ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले, अशी माहिती श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली आहे. (Trust General Secretary Champat Rai)
याविषयी अधिक माहिती देताना मंदिराचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमची विनंती मान्य केली आहे. आम्ही निमंत्रित केल्याप्रमाणे, प्रतिष्ठापनेची तारीख आणि दिवस निश्चित झाला असल्यामुळे ते २२ जानेवारी रोजी राम मंदिरात उपस्थित राहतील.
(हेही वाचा – Israel-Hamas Conflict : इस्त्रायलकडून संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांच्या राजीनाम्याची मागणी )
श्रीराम जन्मभूमी ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले की, मी धन्य आहे. श्रीराम मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसारख्या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आणि या प्रसंगाचे साक्षीदार होण्याचे भाग्य माझ्या वाट्याला आले, यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो.
जय सियाराम!
आज का दिन बहुत भावनाओं से भरा हुआ है। अभी श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट के पदाधिकारी मुझसे मेरे निवास स्थान पर मिलने आए थे। उन्होंने मुझे श्रीराम मंदिर में प्राण-प्रतिष्ठा के अवसर पर अयोध्या आने के लिए निमंत्रित किया है।
मैं खुद को बहुत धन्य महसूस कर रहा… pic.twitter.com/rc801AraIn
— Narendra Modi (@narendramodi) October 25, 2023
या निमंत्रणाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘X’वर लिहिले आहे की, ‘जय सिया राम ! आजचा दिवस भावनांनी भरलेला आहे. नुकतेच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अधिकारी मला माझ्या निवासस्थानी भेटायला आले होते. त्यांनी मला श्रीराम मंदिराच्या अभिषेकप्रसंगी अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले आहे. मला खूप धन्य वाटले. हे माझे सौभाग्य आहे की, माझ्या आयुष्यात मी या ऐतिहासिक प्रसंगाचा साक्षीदार होईन’.