Deepak Kesarkar : पालकमंत्री म्हणतात बॅनर,फलक लावणे अपरिहार्यच, मुंबई विद्रुप करण्याचं असं केलं समर्थन

गणेशोत्सवापासून ते दसऱ्यापर्यंत मुंबईतील प्रत्येक रस्ता आणि गल्लीबोळात राजकीय नेत्यांचे बॅनर व फलक लावले गेले.

141
Deepak Kesarkar : पालकमंत्री म्हणतात बॅनर,फलक लावणे अपरिहार्यच, मुंबई विद्रुप करण्याचं असं केलं समर्थन
Deepak Kesarkar : पालकमंत्री म्हणतात बॅनर,फलक लावणे अपरिहार्यच, मुंबई विद्रुप करण्याचं असं केलं समर्थन

मुंबईला स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचे स्वप्न राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाहत असून त्यांनी मुंबईला विद्रुप करणारे बॅनर व फलक काढून टाकण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. परंतु मागील गणेशोत्सवापासून ते दसऱ्यापर्यंत मुंबईतील प्रत्येक रस्ता आणि गल्लीबोळात राजकीय नेत्यांचे बॅनर व फलक लावले गेले. परंतु याविरोधात महापालिकेकडून कोणतीही कारवाई केली जात नसून मुंबईला विद्रुप करणाऱ्या या बॅनर व फलक लावण्याचे समर्थनच शहराच्या पालकमंत्र्यांकडून केले जात आहे. शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी कार्यक्रमासंदर्भात बॅनर लावणे अपरिहार्य असते असे सांगत त्यांनी मुंबईला विद्रुप करणाऱ्या फलक व बॅनर लावण्याच्या कृतीचे समर्थन केले आहे. (Deepak Kesarkar)

मुंबईत मागील काही दिवसांपासून बॅनर व फलकांविरोधात मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार हटवण्याची मोहिम हाती घेतली होती. परंतु ही कारवाई सुरु असतानाच गणेशोत्सवामध्ये पुन्हा एकदा शिवसेना, भाजप, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा आदी गटांकडून मोठ्याप्रमाणात गणेश भक्तांना शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले. गणेशोत्सवानंतर पुन्हा ही कारवाई करून काही प्रमाणात बॅनर व फलक हटवण्यात आले.

(हेही वाचा : Delhi Air Pollution : दिल्लीकर प्रदूषणाच्या विळख्यात; पराली जाळल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात)

परंतु पुन्हा एकदा नवरात्रोत्सवामध्ये बॅनर व फलक लावून मुंबईला विद्रुप करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यातच दसरा मेळाव्यादिवशी छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात माहिम,दादरमध्ये शिवसेना उबाठा गटाकडून तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आदी परिसरामध्ये महापालिका मुख्यालयासमोरच शिवसेनेकडून बॅनर लावले गेले. ज्या मुख्यमंत्र्यांकडून मुंबईला सुंदर बनवण्याचे स्वप्न पाहून बॅनर व फलक हटवण्याचे निर्देश दिले जातात, त्याच पक्षाकडून हे बॅनर लावले जात असल्याने हे केवळ नावापुरतेच निर्देश की खरोखरची तळमळ आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

त्यामुळे याबाबत शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी पक्षाला आपल्या कार्यक्रमासंदर्भात बॅनर लावणे अपरिहार्य असल्याचे सांगत असे बॅनर व फलक २४ किंवा ४८ तासांमध्ये काढले जातात,असे सांगत यांचे समर्थनच केले. तसेच जर कुठे काढले नसतील तर काढायला सांगितले जातील,असे त्यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.