Pune – Mumbai Express way block : मुंबई – द्रुतगती महामार्गावर एक तासाचा विशेष ब्लॉक

या कालावधीत मुंबईकडील सर्व वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तसेच अवजड वाहतूक उर्से टोलनाक्यावर थांबवण्यात येणार आहे.

236
Pune - Mumbai Express way block : मुंबई - द्रुतगती महामार्गावर एक तासाचा विशेष ब्लॉक
Pune - Mumbai Express way block : मुंबई - द्रुतगती महामार्गावर एक तासाचा विशेष ब्लॉक

मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबईच्या दिशेने बोरघाट हद्दीत ग्रांटी बसविण्यात येणार आहे. यासाठी गुरुवारी रोजी १२ ते १ असा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत मुंबईकडील सर्व वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तसेच अवजड वाहतूक उर्से टोलनाक्यावर थांबवण्यात येणार आहे. (Pune – Mumbai Express way block)
फक्त कार साठी किमी ५५ लोणावळा एक्झीट येथून जुना पुणे मुंबई महामार्ग – अंडा पॉईंट – द्रुतगती महामार्ग – खोपोली exit – इंदिरा चौक खोपोली मार्गे वाहतूक सुरू राहणार आहे.गेल्या काही दिवसांपासून द्रुतगती महामार्गावर विशेष ब्लॉक घेतला जात आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ग्रँटी उभारण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. त्या दृष्टिकोनातून हे ब्लॉक घेतले जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. हा ब्लॉक मुंबईच्या दिशेची वाहतूक बंद करण्यात येणार असून यावेळेत प्रवास न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(हेही वाचा : Share Market : पाचव्या दिवशीही शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे किती बुडाले; वाचा सविस्तर)
काम पुर्ण झाल्यावर दुपारी १ वाजता सदर वाहिनीवरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावरून दिवसभरात लाखो वाहने ये – जा करत असतात. एक तासाचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार असून प्रवाशी नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी या वेळेत प्रवास करणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे या वेळेत महामार्गावरून प्रवास करणं टाळावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.