Ashish Shelar : खबरदार जर पंतप्रधानांचा उल्लेख एकेरीत कराल तर, आशिष शेलार यांचा उध्दव ठाकरेंना सक्त इशारा

117
Ashish Shelar : खबरदार जर पंतप्रधानांचा उल्लेख एकेरीत कराल तर, आशिष शेलार यांचा उध्दव ठाकरेंना सक्त इशारा
Ashish Shelar : खबरदार जर पंतप्रधानांचा उल्लेख एकेरीत कराल तर, आशिष शेलार यांचा उध्दव ठाकरेंना सक्त इशारा

खबरदार उध्दव ठाकरे पंतप्रधानांच्या कुटुंबावर तर बोलू नकाच, ऐकेरीत अजिबातच बोलू नका.जर यापुढे पंतप्रधानांचा ऐकेरी उल्लेख केलात तर आमचे नेतेही तुमचा अपमानच करतील, तो सहन करण्याची तयारी ठेवा, असा बुधवारी (२५ ऑक्टोबर) येथे एका पत्रकार परिषदेत इशारा देत आमदार अँड आशिष शेलार यांनी आम्ही “मेरी माटी मेरा देशवाले” आहोत तुमच्या सारखे “माझे कुटुंब माझी जबाबदारी” वाले नाही, असा सणसणीत टोलाही लगावला. (Ashish Shelar)

पोकळ शब्दांचा खोडकळ नेता….

“मी करणार म्हणजे करणारच….!” आरक्षण देणार म्हणजे देणारच…! शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार म्हणजे करणारच…! शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार म्हणजे करणारच..! महापालिकेवर भगवा फडकवणार म्हणजे फडकवणारच…!अशा गेल्या १० वर्षात १ हजार ५१३ घोषणा केल्या.. आमच्या बॅक ऑफिसने कालच यांची मागची दहा वर्षातील भाषणे काढली. त्यामध्ये आश्चर्यकारक ही माहिती समोर आली. काय झाले पुढे त्यांचे? त्यामुळे यांच्या शब्दाला किंमतच नाही.उध्दव ठाकरे म्हणजे “पोकळ शब्दांचे खोडकळ नेते” आहेत, अशा शब्दांतही शेलार यांनी ठाकरे यांची खिल्ली उडविली.

पंतप्रधानांच्या कुटुंबाचा विषय तुम्हीच काढलाय तर मग तुम्हाही काही प्रश्नाची उत्तरे द्यावे लागतील,सांगा उध्दवजी की, तुम्ही तुमच्या सख्या भावा विरोधात न्यायालयात लढलात की नाही?तुमचे तुमच्या वहिनी सोबत कौटुंबिक नाते आहे,की भांडण.? वडिलांची मालमत्ता तुम्ही हडप केली म्हणून तुमच्याच सख्या भावाने आरोप केले की नाही? …चुलत भावाला घराबाहेर,पक्षातून बाहेर काढण्यात तुम्हाला आनंद मिळाला की नाही? असे कुटुंबातील बरेच विषय निघतील. त्यामुळे आमच्या पंतप्रधानांच्या कुटुंबावर तर बोलू नकाच, ऐकेरीत अजिबातच बोलू नकाच या इशाऱ्याचा पुनरुच्चारही आ. शेलार यांनी केला.

(हेही वाचा : Covid Death : महापालिकेच्या २७ कामगारांच्या वारसांचे दावे अपात्र)

ज्यांची मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायती मध्ये असलेली सत्ता जाण्याची वेळ आलेय, त्यांना महाराष्ट्रात आणि देशात सत्ता येणात अशी स्वप्न पडू लागली आहेत. तुमचे खासदार सोडून गेले,आमदार, नगरसेवक,जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समितीचे सदस्य,सरपंच सगळे पक्ष सोडून गेले मग तुमची ग्रामपंचाय तीत जी सत्ता होती ती तरी टिकेल का?असा टोलाही आ.शेलार यांनी लगावला.

मुंबईत आलेले उद्योग पळवून लावायचे तुम्ही,मुंबईत बुलेट ट्रेन,मेट्रो, मेट्रो कारशेड,कोस्टल रोड,समृद्धी महामार्ग, नवे विमानतळ,जैतापूर प्रकल्प,वाढवण बंदर प्रत्येक प्रकल्पाला विरोध उबाठाने केला.हे विकासाच्या वाटेतील गतिरोधक झाले आहेत, हे कालच्या भाषणात जाहीरपणे त्यांनी दाखवले, असाही टोला आ.शेलार यांनी लगावला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.