मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक मतदार नोंदणीत उबाठा (Senate Election) सेनेने केलेल्या घोटाळ्यावर अखेर चौकशी समितीने दिलेल्या अहवालात घोटाळा झाल्यावर शिक्कामोर्तबच केलेले असून पुन्हा मतदार यादी तयार करा असे निर्देश विद्यापीठाला दिले. हा एक संघटीत आर्थिक ही घोटाळा आहे, त्यामुळे या प्रकरणी फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बुधवारी मुंबई भाजपा अध्यक्ष आणि या प्रकरणात तक्रारदार असलेल्या आ. आशिष शेलार यांनी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना केली.
सिनेट निवडणूक मतदार नोंदणीत उबाठा सेनेने केलेल्या घोटाळ्यावर अखेर चौकशी समितीने दिलेल्या अहवालात घोटाळा झाल्याचे शिक्कामोर्तब केले. पुन्हा मतदार यादी तयार करा असे निर्देश विद्यापीठाला दिले.
यातून आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली की, हे सगळे प्रकरण गंभीर आहे. एक आर्थिक घोटाळाही यामध्ये… pic.twitter.com/7jKjkpdGeC
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 25, 2023
आज आलेल्या अहवालातून आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली की, हे सगळे प्रकरण गंभीर आहे.एक आर्थिक घोटाळाही यामध्ये करण्यात आला आहे. मतदारांना कोणत्याही प्रकारची माहिती नसताना, एकाच नंबर वरुन, एकाच बँक खात्त्यावरुन,एकाच एटीएम मधून मतदार नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे. तेही विद्यापीठाच्या खात्यावर जमा न होता ते कंत्राटदाराच्या खात्यात पैसे गेले आहेत.आम्ही त्याचेही पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे आता याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा व सोबत या आर्थिक घोटाळ्यांचीही आयकर खात्यामार्फत सरकारने चौकशी करावी, अशीही मागणी आ.शेलार यांनी केली.