पुण्यातील ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेला ड्रगमाफिया ललित पाटील (Lalit Patil Drug Case) याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तामिळनाडूतील चेन्नई येथे अटक केली. तो २ ऑक्टोबरला रुग्णालयातून पळून गेला होता. गेल्या १५ दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते.
ललिल पाटील (Lalit Patil Drug Case) रुग्णालयातून पळून गेल्यानंतर रुग्णालय प्रशासन आणि येरवडा कारागृह प्रशासन याबाबत अनेक आरोप- प्रत्यारोप होत होते. राजकीय आरोप-प्रत्यारोपांचाही यामध्ये समावेश झाला. यादरम्यान पुणे पोलिसांनी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना उत्तर प्रदेश येथून अटक केली. त्या दोघांना २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
(हेही वाचा – Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड; तिघांना अटक)
अशातच आता ललित पाटील (Lalit Patil Drug Case) प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. त्या अपडेटनुसार आता या प्रकरणात नाशिकच्या सराफाला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्जच्या पैशातून ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याने या सराफाकडून सोने खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे.
भूषण पाटील याने तब्बल आठ किलोचे सोने खरेदी केले असून यापैकी ३ किलो सोने हस्तगत, उर्वरित ५ किलो सोने (Lalit Patil Drug Case) जप्त करणे बाकी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. हे उर्वरित सोने कुठे लपवले याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community