नुकताच मिळालेल्या माहितीनुसार जेष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar) यांचं निधन झालं आहे. ते 89 वर्षांचे होते. नवी मुंबईती नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
दरम्यान, बाबा माहाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar) यांचं पार्थिव आज दुपारी तीननंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात येईल.
ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन
ते 89 वर्षांचे होते. नवी मुंबईती नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पार्थिवावर शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.#BabamaharajSatarkar #Kirtankar #Marathinews pic.twitter.com/hnO2oN52G4— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) October 26, 2023
(हेही वाचा – Asian Para Games 2023 : सुमित अंतिलची विश्वविक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी )
बाबा महाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar) यांनी 1983 पासून संतांच्या गावी दरवर्षी कीर्तन सप्ताह आयोजन करण्याची परंपरा सुरू केली. त्यांनी जनसेवा करण्यासाठी चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेचीही स्थापना केली. या माध्यमातून भाविकांना वैद्यकीय सुविधाही पुरवण्यात येते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community