Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस यांची अज्ञातस्थळी शहा यांच्याशी चर्चा?

अजित पवारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय

149
Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस यांची अज्ञातस्थळी शहा यांच्याशी चर्चा?
Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस यांची अज्ञातस्थळी शहा यांच्याशी चर्चा?

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा विडा उचलणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणावर बसल्यामुळे महाराष्ट्र सरकारचे धाबे दणाणले आहे. या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (२५ ऑक्टोबर) दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असल्याचे समजते. (Maharashtra Politics)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बुधवारी तडकाफडकी दिल्ली गाठून गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असल्याची चर्चा देशाच्या राजधानीत रंगली आहे. मात्र, शिंदे आणि फडणवीस शहा यांना कुठे भेटले? किती वाजता भेटले? आणि उभय नेत्यांमध्ये कोणकोणत्या मुद्यांवर चर्चा झाली? याबाबत काहीही माहिती कळू शकलेल नाही. (Maharashtra Politics)

महत्वाचे म्हणजे, मनोज जरांगे पाटील उपेषणावर बसताच शिंदे आणि फडणवीस यांनी दिल्लीकडे धाव घेतली. ही माहिती कळताच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गाठण्यासाठी विमानतळावर पोहचले होते. काही प्रतिनिधी विमानतळावर होते तर काही प्रतिनिधी गृहमंत्री अमित शहा यांच्या कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानाबाहेर प्रतिक्षा करीत होते. (Maharashtra Politics)

(हेही वाचा – Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं लोकार्पण)

परंतु, शिंदे आणि फडणवीस पत्रकारांना गुंगारा देत विमानतळावरून अज्ञात स्थळी निघून गेले. तर इकडे, शहा स्वत: आपल्या ताफ्यासह बाहेर निघाले. यानंतर ही मंडळी नेमकी कुठे गेली? त्यांची बैठक कुठे झाली? याचा पत्रकारांना सुध्दा थांगपत्ता लागला नाही. (Maharashtra Politics)

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर उभय नेत्यांना गुप्त बैठक का कराविसी वाटली? उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला का आले नाहीत? असे प्रश्न एकमेकांना विचारला जात आहे. या बैठकीबाबतचा काहीही तपशील कळू शकला नसला तरी भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली असल्याचे ऐकिवात आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासोबतच मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा झाली असल्याचे अनधिकृत माहिती प्राप्त झाली आहे. (Maharashtra Politics)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.