मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या ‘क्रिकेट विश्वचषक २०२३’ सामना पहायला येणाऱ्या क्रिकेट रसिकांसाठी आनंदाची बातमी आहे. मैदानात सामने पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांना मुंबई क्रिकेट असोसिएशनने पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
ही सेवा रसिकांना एकदाच दिली जाईल, असे एमसीएने (MCA) त्यांच्या अधिकृत Xवर पोस्ट करून लिहिले आहे.
MCA President Shri @Amolkk1976 and all the apex council members have decided to provide complimentary one-time servings of popcorn and a cold beverage to all fans attending World Cup matches at Wankhede.😍#CWC23 #MCA #MumbaiCricket #IndianCricket #Wankhede #BCCI pic.twitter.com/eLlxFWKPA1
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) October 26, 2023
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी वानखेडे स्टेडियमवर उपस्थित राहणाऱ्या क्रिकेट रसिकांना एका वेळी मोफत पॉपकॉर्न आणि शीतपेये देण्याचा निर्णय घेतला आहे.
२ नोव्हेंबरला वानखेडे मैदानावर भारत विरुद्ध श्रीलंकेचा सामना होणार आहे. ७ नोव्हेंबरला याच मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान सामना होणार आहे. विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पहिल्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघाचा सामनाही याच मैदानावर १५ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. २ नोव्हेंबरला होणाऱ्या हिंदुस्थान विरुद्ध श्रीलंकेच्या सामन्यापासून मोफत पॉपकॉर्न आणि शीतपेये देण्यास सुरुवात केली जाणार आहे.
Join Our WhatsApp Community