PM Narendra Modi : शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? पंतप्रधान मोदींची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगरच्या शिर्डी दौऱ्यावर होते.

189
PM Narendra Modi : शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? पंतप्रधान मोदींची टीका
PM Narendra Modi : शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? पंतप्रधान मोदींची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली.यावेळी त्यांनी ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाचा उल्लेख करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. तर त्यांचे कार्य हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नाव फक्त राजकारणासाठी वापरले गेलं मात्र २०१४ नंतर हे चित्र बदललं. आपल्या सरकारने शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी काम केलं असे सांगत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर चांगलीच टीका केली. (PM Narendra Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगरच्या शिर्डी दौऱ्यावर होते. यावेळी शिर्डीजवळील काकडी गावात गुरुवारी (२६ ऑक्टोबर) सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी यावेळी पुढे बोलताना मोदी म्हणाले की २०१४ च्या आधी महाराष्ट्रातील एक नेते अनेक वेळा राज्याचे कृषिमंत्री राहून गेले. मात्र त्या काळात शेतकऱ्यांचे मोठे हाल होते. शेतकऱ्यांसाठी कुठलीच योजना काम करत नव्हती. शेतकऱ्यांना अनेकदा हेलपाटे मारावे लागत होते. व्यक्तिगतरीत्या मी त्यांचा सन्मान करतो मात्र सात वर्षांच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी देशभरातल्या शेतकऱ्यांकडून साडेतीन लाख कोटी एमएसपी वर धान्य खरेदी केले परंतु आपल्या सरकारने सात वर्षात साडेतीन लाख कोटी रुपयांच्या एमएसपीवर धान्य खरेदी केल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं.

शिर्डीच्या या पावनभूमीला माझे कोटी कोटी नमन! पाच वर्षांपूर्वी या पवित्र मंदिराला १०० वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी मला साई दर्शनाची संधी मिळाली होती. आज साईबाबांच्या आशीर्वादाने साडेसात हजार कोटींच्या विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण झालं आहे. महाराष्ट्राला पाच दशकांपासून ज्या निळवंडे धरणाची प्रतीक्षा होती ते कामही पूर्ण झालं आहे. मी हे माझं भाग्य मानतो की तिथे जलपूजनाची संधी मला मिळाली असं मोदी यांनी म्हटलं आहे. मंदिराशी जोडलेल्या गेल्या ज्या प्रकल्पांचं लोकार्पण झालं आहे त्यांचं भूमिपूजनही मी केलं होतं. आता देश-विदेशातल्या श्रद्धाळूंना दर्शनासाठी सुलभता येईल. असंही मोदी यांनी म्हटलं. दशकांपासून लटकलेल्या महाराष्ट्रतील आणखी ३६ आणखी सिंचन योजना केंद्र सरकार पूर्ण करणार आहे. याचा खूप मोठा लाभ आपल्या शेतकऱ्यांना, दुष्काळग्रस्त भागांना होईल.पण आता या धरणातून पाणी मिळणं सुरु झालं आहे तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की, हा परमात्म्याचा प्रसाद आहे. त्यामुळं यातील एक थेंबही पाणी वाया जाता कामा नये. ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’ याअंतर्गत जेवढी पण अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा आपण वापर केला पाहजे, असं आवाहनही यावेळी मोदींनी केली.
(हेही वाचा : JK Encounter : कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; २ दहशतवादी ठार)

गरीब कल्याणासाठी सरकार कटिबद्ध आहे
देशाला गरीबीपासून मुक्ती मिळाली पाहिजे. गरीबांना पुढे जाण्याची संधी मिळाली पाहिजे हाच सच्चा न्याय आहे. आपलं सरकार सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन पुढे चाललं आहे. आमची प्राथमिकता गरीबांचं कल्याण आहे. आज देशाची अर्थव्यवस्था वाढते आहे. त्यात गरीब कल्याणासाठी सरकारचं बजेटही वाढतं आहे. आज महाराष्ट्रात १ कोटी १० लाख आयुष्मान कार्ड दिले जात आहेत. या कार्डधारकांना पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत असणार आहेत असंही मोदी यांनी जाहीर केलं आहे. या योजनेसाठी ७० हजार कोटी केले आहेत. गरीबांच्या घरांसाठी ४ लाख कोटी रुपये खर्च केले. २०१४ च्या आधीच्या दहा वर्षांच्या तुलनेत हे सगळे खर्च सहापट जास्त आहेत असंही मोदी यांनी म्हटलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.