Lalit Patil : ललित पाटीलला ससूनमधून पळून जाण्यासाठी एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मदत केल्याची चर्चा

या निवृत्त अधिकाऱ्याने ललित पाटीला रुग्णालयात व्हीआयपी सवलत मिळवून देण्यासाठी मदत केली व तसेच त्याला पळून जाण्यास देखील मदत केली असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

190
Lalit Patil : ललित पाटीलला ससूनमधून पळून जाण्यासाठी एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मदत केल्याची चर्चा
Lalit Patil : ललित पाटीलला ससूनमधून पळून जाण्यासाठी एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मदत केल्याची चर्चा

ललित पाटीलला ससून रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी एका उद्योगपतीला अटक केली आहे. या प्रकरणात एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या नावाची चर्चा मुंबई पोलिस दलात सुरू आहे. या निवृत्त अधिकाऱ्याने ललित पाटीला रुग्णालयात व्हीआयपी सवलत मिळवून देण्यासाठी मदत केली व तसेच त्याला पळून जाण्यास देखील मदत केली असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. (Lalit Patil)

ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले आहे. पाटील हा ससून रुग्णालयातुन पळून गेल्यानंतर त्याला रुग्णालयातून पळून लावल्याचे आरोप राजकीय वर्तुळात सुरू होते. दरम्यान, मुंबई पोलिसांनी ललित पाटील याला बंगळुरू येथून अटक केल्यानंतर ललित पाटील याने एका वृत्तवाहिन्यांच्या कॅमेरासमोर मला पळवून लावले, आणि पळून लावणाऱ्यांचे नावे उघड करील असे ललितने म्हटले होते. ललितच्या या वक्तव्यामुळे राज्यात विविध राजकीय पक्षात आरोप प्रत्यारोप सुरू होते. परंतु ललित पाटीलने केलेल्या वक्तव्य केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी होती असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. ललित पाटील प्रकरणात कुठलाही राजकीय पुढारी नसून त्या मागे पुण्यातील उद्योगपती आणि मुंबईतील एक निवृत्त पोलीस अधिकारी असल्याची चर्चा आहे. (Lalit Patil)

(हेही वाचा – Malad Vedic Theme Park : मालाडमधील वेदिक थीम पार्क बनवण्याचा मार्ग मोकळा, अडथळा ठरणारी हटवली ६३ फर्निचरची दुकाने)

पुणे पोलिसांनी बुधवारी पुण्यातील उद्योगपती आणि रोजरी एज्युकेशन ग्रुपचे संचालक विनय आरान्हा याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. विनय आरान्हा याच्यावर ललित पाटील याला मदत केल्याचा आरोप आहे. विनय आरान्हा यांना ईडीने अटक केली होती, तेव्हा पासून ते येरवडा तुरुंगात होते. या उद्योजकावर ससूनमध्ये उपचार सुरू असताना ललित पाटील आणि विनय आरान्हा जे ससून येथील एकाच वॉर्ड मध्ये दाखल होते. त्यावेळी ललित पाटील आणि आरान्हा याची ओळख झाली होती. ललित पाटील हा ससून रुग्णालयातून बाहेर पडल्यावर आरान्हा यांच्या सांगण्यावरून त्यांच्या माणसांनी ललितला आर्थिक मदत केली होती अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली. (Lalit Patil)

बुधवारी पुणे पोलिसांनी रुग्णालयातून त्याला अटक केली. ललित पाटील सध्या मुंबई पोलिसांच्या कोठडीत असून त्याला रुग्णालयातून पळून जाण्यास कुठल्या नेत्यांचा नव्हे तर एका निवृत्त पोलीस अधिकारी याचा हात असल्याची जोरदार चर्चा मुंबई पोलीस दलात सुरू आहे. हा निवृत्त अधिकारी देखील त्या काळात ससून रुग्णालयात उपचार घेत असल्या कारणाने संशयाची सुई या अधिकाऱ्यापर्यत पोहचत असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. परंतु अटकेत असलेला ललित पाटील याने अद्याप या अधिकाऱ्याचे नाव उघडकीस केलेले नाही. (Lalit Patil)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.