Devendra Fadnavis: आमच्याकडे दुष्काळमुक्तीचा आराखडा तयार, पैसे द्या; फडणवीस यांची मोदींना विनंती

महाराष्ट्रातील ५० टक्के भाग दुष्काळग्रस्त आहे.

167
Devendra Fadnavis: आमच्याकडे दुष्काळमुक्तीचा आराखडा तयार, पैसे द्या; फडणवीस यांची मोदींना विनंती
Devendra Fadnavis: आमच्याकडे दुष्काळमुक्तीचा आराखडा तयार, पैसे द्या; फडणवीस यांची मोदींना विनंती

महाराष्ट्रातील पन्नास टक्के भागात दुष्काळसदृश्य स्थिती आहे. या भागात पाणी पोहोचत नाही, तोपर्यंत शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसता येणार नाही. आमच्याकडे आराखडा तयार आहे. केंद्राने मदत केली तर संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करता येईल, अशा विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi) यांना केली आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी शिर्डीत विविध विकासकामांचे लोकार्पण आणि पायाभरणी झाली. यावेळी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना फडणवीस यांनी केंद्राकडे विविध योजनांच्या निधीची मागणी केली. याविषयी त्यांनी सांगितले की, या योजनेचा संपूर्ण आराखडा आणि प्रकल्प राज्य सरकारने तयार केला आहे. आपल्याला विदर्भातील वैनगंगा नदीतून वाहून जाणाऱ्या १००टीएमसी पाण्यापैकी ६७ टीएमसी पाणीही दुष्काळग्रस्त भागातून नळगंगापर्यंत आणता येईल. यामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र कायमस्वरुपी दुष्काळमुक्त होईल. केवळ तुम्ही आशीर्वाद द्या.

(हेही वाचा – Qatar Court : कतारमध्ये भारतीय नौदलाच्या ८ माजी कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून निवेदन जारी )

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील ५० टक्के भाग दुष्काळग्रस्त आहे. येथे पाऊस पडण्याचे प्रमाण फारच कमी असते. येथील दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचत नाही. जोपर्यंत या भागात पाणीपुरवठा होत नाही तोपर्यंत शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसता येणार नाही. हे तुमच्या आशीर्वादाने होऊ शकते. पश्चिम वाहिनी नद्यांचे सुमुद्रात जाणारे पाणी गोदावरी नदीत आणून अहमदनगरपासून संपूर्ण मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करू शकतो, असे उद्दगार त्यांनी नरेंद्र मोदींना उद्देशून काढले.

केंद्राने महाराष्ट्राला यापूर्वीही भरघोस मदत केली आहे. आणखी थोडी मदत या प्रकल्पांना केली, तर मोठी मदत होईल. आमच्या पिढीने महाराष्ट्रात दुष्काळ पाहिला, पण भावी पिढी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात दुष्काळ पाहणार नाही हे सर्वकाही केंद्राच्या मदतीवर अवलंबून आहेत, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.