VVS Laxman To Replace Rahul Dravid? ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी व्ही व्ही एस लक्ष्मण?

विश्वचषक संपल्यानंतर एका आठवड्याच्या आत भारताची ऑस्ट्रेलियाबरोबरची टी-२० मालिका रंगणार आहे आणि या मालिकेपासून राहुल द्रविड यांची मुख्य प्रशिक्षकाची जागा व्ही व्ही एस लक्ष्मण घेतली अशी दाट चिन्हं आहेत.

235
VVS Laxman To Replace Rahul Dravid? ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी व्ही व्ही एस लक्ष्मण?
VVS Laxman To Replace Rahul Dravid? ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी व्ही व्ही एस लक्ष्मण?
  • ऋजुता लुकतुके

विश्वचषक संपल्यानंतर एका आठवड्याच्या आत भारताची ऑस्ट्रेलियाबरोबरची टी-२० मालिका रंगणार आहे आणि या मालिकेपासून राहुल द्रविड यांची मुख्य प्रशिक्षकाची जागा व्ही व्ही एस लक्ष्मण घेतली अशी दाट चिन्हं आहेत. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय क्रिकेट संघाने अलीकडे भारतात आणि परदेशातही दमदार कामगिरी केली आहे. या घडीला एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी क्रमवारीतही भारतीय संघ अव्वल क्रमांकावर आहे. पण, राहुल यांचा संघाबरोबरचा करार हा विश्वचषक स्पर्धेपर्यंतच आहे आणि कौटुंबिक कारणामुळे राहुल कराराची मुदत वाढवून इच्छित नाहीत. (VVS Laxman To Replace Rahul Dravid?)

त्यामुळे सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष असलेले व्ही व्ही एस लक्ष्मण तात्पुरत्या काळासाठी प्रशिक्षक म्हणून संघाबरोबर असतील अशी दाट शक्यता आहे. विश्वचषक स्पर्धा १९ नोव्हेंबरला संपली की, लगेचच एका आठवड्याच्या आत भारतीय संघ ऑस्ट्रेलिया बरोबर ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. (VVS Laxman To Replace Rahul Dravid?)

राहुल द्रविड आणि भारतीय संघ यांचं एक नातं सध्या निर्माण झालं आहे. प्रशिक्षक होण्यापूर्वी ते राष्ट्रीय अकादमीचे अध्यक्ष होते आणि तिथपासूनच त्यांचा सध्याच्या खेळाडूंबरोबरचा संवाद वाढला. आणि यापूर्वी संघाबरोबर सतत प्रवास करायला नाही म्हणणारे राहुल द्रविड अडीच वर्षांपूर्वी मुख्य प्रशिक्षक व्हायलाही तयार झाले. (VVS Laxman To Replace Rahul Dravid?)

(हेही वाचा – Lalit Patil : ललित पाटीलला ससूनमधून पळून जाण्याऱ्यापैकी एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या नावाची जोरदार चर्चा)

आताही बीसीसीआय कराराच्या मुदतवाढीसाठी त्यांना विनंती करु शकतं. पण, अर्थात, संघाबरोबर इतका प्रवास आणि कामगिरीचं सततचं दडपण या गोष्टींसाठी ५१ वर्षीय राहुल द्रविड तयार होतील का हा प्रश्नच आहे. शिवाय एकदिवसीय विश्वचषकाचा थकवणारा कार्यक्रम संपल्यावर राहुल द्रविड यांच्यासह भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंनाही या मालिकेसाठी विश्रांतीच मिळण्याची शक्यता जास्त आहे. या विश्वचषकाच्या निमित्ताने भारतीय संघ १०,००० किलोमीटरपेक्षा जास्त फिरला आहे. त्यामुळे संघाला सुटीचीही गरज आहे. (VVS Laxman To Replace Rahul Dravid?)

त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत व्ही व्ही एस लक्ष्मण संघाचे प्रशिक्षक होण्याची दाट शक्यता आहे. पीटीआयने या संबंधीची बातमी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. ‘जेव्हा जेव्हा काही कारणांमुळे राहुल द्रविड उपलब्ध नव्हते, तेव्हा लक्ष्मण यांनीच तात्पुरती जबाबदारी उचलली आहे. शिवाय आता बीसीसीआयने प्रशिक्षक पदासाठी नवीन अर्ज मागवले तर लक्ष्मण यांच्याच नावाची सर्वाधिक चर्चा असेल,’ असं पीटीआयने आपल्या बातमीत म्हटलं आहे. भारताची ऑस्ट्रेलिया बरोबरची टी-२० मालिका विशाखापट्टणम इथं २३ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. (VVS Laxman To Replace Rahul Dravid?)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.