Mumbai Pollution : मुंबईतील प्रदूषणकारी प्रकल्पांवर सीसीटीव्ही बसवा, आशिष शेलार यांची फडणवीसांकडे मागणी

मुंबईत हवा प्रदूषणात कमालीची वाढ झाली असून मुंबईकरांचा श्वास गुदमरुन गेला आहे.

239
Mumbai Pollution : मुंबईतील प्रदूषणकारी प्रकल्पांवर सीसीटीव्ही बसवा, आशिष शेलार यांची फडणवीसांकडे मागणी
Mumbai Pollution : मुंबईतील प्रदूषणकारी प्रकल्पांवर सीसीटीव्ही बसवा, आशिष शेलार यांची फडणवीसांकडे मागणी

मुंबईत हवा प्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या सहा हजार बांधकाम साईटवर सीसीटीव्ही लावून मुंबई महापालिकेने लक्ष ठेवावे. तसेच मुंबईत प्रदूषण करणारी अवजड वाहने, माहुलचे उद्योग, बेकऱ्या, भट्ट्या याबाबत तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी गुरुवारी (२६ ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली. (Mumbai Pollution)

मुंबईत हवा प्रदूषणात कमालीची वाढ झाली असून मुंबईकरांचा श्वास गुदमरुन गेला आहे. याला जबाबदार उद्धव ठाकरे आणि तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे असल्याची टीका शेलार यांनी केली आहे. कोविड काळात बिल्डरांना तत्कालीन ठाकरे सरकारने किटकमिशनसाठी प्रिमियम सवलतीची खैरात केली. त्यामुळे मुंबईत एकाच वेळी मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु झाली असून त्यामुळे धूळ, धूर याने मुंबईची हवा दूषित झाली आहे. सोबत गेल्या पंचवीस वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता असताना उबाठाने मुंबईतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने अवलंबल्याने डंम्पिंग ग्राऊंडवर लागणाऱ्या आगी, धूर, विषारी वायूमुळे ही मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे, असा आरोप शेलार यांनी केला आहे.

(हेही वाचा : Azad Maidan : शिवसेनेला हवाय आझाद मैदानातही शिवरायांचा पुतळा)

शेलार यांनी मुंबईतील हवा प्रदूषणाबाबत फडणवीस यांना पत्र लिहून काही बाबींकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. यामध्ये सर्व बांधकाम क्षेत्राच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. या बांधकामावर मुंबई महापालिकेने लक्ष ठेवावे. तसेच याबाबत तज्ञांची समिती गठीत करण्यात यावी. माहुलमधील प्रदूषणकारी कंपन्या अन्यत्र स्थलांतरित करण्याबाबत विचार करण्याची गरज असून त्यासाठी कार्यवाही करण्यात यावी. मुंबई परिसरातील उद्योगांसाठी दोन दशलक्ष टन कोळसा आणि प्रदूषणकारी इंधन वापरले जाते. त्यांना नैसर्गिक वायू वापर करणे बंधनकारक करण्यात यावे. मुंबईतील बेकरी, लॉन्ड्री, बेकायदेशीर भट्ट्या लाकूड, कोळसा वापरतात आणि हानिकारक धूर सोडतात. त्यांना गॅस वापरणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी शेलार यांनी पत्रात केली आहे. मुंबईतील प्रक्रिया न केलेला ओला, अन्न, प्राण्यांचा कचरा सीएनजी इंधनात रूपांतरित केल्यास ३५० कोटीचे इंधन उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे कचरा जाळणे आणि प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने प्रत्येक वॉर्डांमध्ये ३० बायोसीएनजी प्रकल्पांची निर्मिती करण्यात यावी. मुंबईत प्रवेश करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीसह सर्व अवजड वाहनांची प्रदूषण उत्सर्जन नियंत्रणासाठी तपासणी करणे आवश्यक आहे, अशा विविध मागण्या आशीष शेलार यांनी पत्रात केल्या आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.