गेल्या काही दिवसांपासून सतत रस्ते अपघाताच्या (Bangalore Accident) घटना घडत आहेत. अशातच पुन्हा एकदा एका भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. या अपघातात पूजा करून परतत असतांना गाडीचा भीषण अपघात झाला आणि यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाली आहेत. या मृतांमध्ये मुलांसह आठ पुरुष तर चार महिलांचा समावेश आहे. (Bangalore Accident)
सविस्तर माहितीनुसार, बंगळुरू (Bangalore Accident) येथील चिक्कबळ्ळापूर शहराच्या हद्दीतील चित्रावतीजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला वाहनाची धडक बसल्याने हा अपघात घडला. काल म्हणजेच गुरुवार 26 ऑक्टोबर रोजी सकाळी ही दुर्घटना घडली. या अपघातात आठ पुरुष, चार महिला आणि मुलाचा मृत्यू झाला आहे.
(हेही वाचा – Manoj Jarange Patil : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा जरांगे पाटील यांना पाठिंबा; एक दिवस बाजार समिती बंद)
आयुधपूजेच्या निमित्ताने आपापल्या गावी गेलेल्या मजुरांनी कुटुंबियांसमवेत आनंदाने उत्सव साजरा केला. त्यानंतर रात्री बंगळूरला (Bangalore Accident) परतण्यासाठी ते आंध्रप्रदेशातून आलेल्या गाडीमध्ये बसले.
काल सकाळी सात वाजण्याच्या सुमारास चिक्कबळ्ळापूर ग्रामीण पोलिस स्टेशनअंतर्गत चित्रावतीजवळ येत असताना रस्त्याच्या कडेला सिमेंट घेऊन जाणारा ट्रक उभा होता. या ट्रकला गाडीने मागून जोराची धडक दिली आणि भीषण अपघात (Bangalore Accident) घडला. स्थानिक नागरिकांनी गाडीचे मागील दरवाजे काढून अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. गंभीर जखमींना रुग्णालयात नेत असतांना वाटेतच सातजणांचा मृत्यू झाला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community