India’s 2036 Olympic Bid : भारत ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यासाठी तयार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा

168
India’s 2036 Olympic Bid : भारत ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यासाठी तयार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा

ऋजुता लुकतुके

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३६ च्या ऑलिम्पिक (India’s 2036 Olympic Bid) आयोजनासाठी भारत किती उत्सुक आहे ते पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. गोव्यात गुरुवारपासून (२६ ऑक्टोबर) सुरू झालेल्या राष्ट्रीय खेळांच्या उद्घाटन समारंभातही त्यांनी दोन गोष्टी निक्षून सांगितल्या. एक म्हणजे भारताने आपली क्रीडाविषयक आर्थिक तरतूद मागच्या ९ वर्षांत तिपटीने वाढवली आहे आणि त्यामुळे भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करत आहेत. भारतात क्रीडानिपुण खेळाडूंची कमतरता नाही, असं ते म्हणाले.

मोदींनी केलेल्या या विधानाला पार्श्वभूमी आहे ती आशियाई खेळांमध्ये भारताने मिळवलेल्या १०७ पदकांची. सरकारी धोरणांमध्ये झालेल्या बदलांमुळे खेळाडूंना सरकारकडून आर्थिक पाठिंबा मिळत आहे. त्यातून नवनवीन खेळाडू (India’s 2036 Olympic Bid) घडत आहेत, असं नरेंद्र मोदी आपल्या भाषणात सुरुवातीला म्हणाले.

‘२०१४ पासून भारतात खेळांसाठी (India’s 2036 Olympic Bid) आवश्यक पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या आहेत. आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीची निवड प्रक्रियाही जास्त पारदर्शी झाली आहे. शिवाय खेळाडूंना मिळणारी आर्थिक मदतही वाढली आहे,’ असं मोदी यांनी बोलून दाखवलं. या बदलांमुळे खेळाडू आणि खेळाच्या प्रगतीतील अडथळे दूर झाल्याचं त्यांचं सांगणं होतं.

‘भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये (India’s 2036 Olympic Bid) पहिल्या तीनामध्ये दिसावेत यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. खेळाडूंना मदतीबरोबरच उद्दिष्टं ठरवून देण्यात आली. आणि त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण पाहतो आहोत,’ असं पंतप्रधानांनी म्हटलं. त्याचबरोबर आधीच्या सरकारांनी खेळांसाठी केलेली आर्थिक तरतूद आणि आताच्या सरकारची तरतूद यातील तफावत त्यांनी लोकांसमोर मांडली.

(हेही वाचा – Virat Kohli : नेट्समध्ये जेव्हा विराट कोहली शुभमनला गोलंदाजी करतो…)

‘खेळांसाठी सरकारने (India’s 2036 Olympic Bid) केलेली तरतूद सर्वंकष आहे. शाळा, महाविद्यालय तसंच विद्यापीठांमधले चांगले खेळाडू हेरून त्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याचं धोरण आम्ही ठरवलं आहे. अशा होतकरू मुलांना सरकार डाएट आणि प्रशिक्षण यासाठी मदत करतं,’ असं मोदी यांनी स्पष्ट केलं. सरकारच्या या धोरणानंतर खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा झाल्याचा दावाही केला.

मोदी यांनी या भाषणातून ऑलिम्पिक (India’s 2036 Olympic Bid) भरवण्याविषयी सरकारची कटीबद्धता पुन्हा एकदा बोलून दाखवली. ‘आम्हाला देशात ऑलिम्पिक भरवायचं आहे. आणि हे आम्ही फक्त भावनिक रित्या म्हणत नाही. आम्ही ते करून दाखवणार आहोत. आम्हाला वाटणाऱ्या आत्मविश्वासामागे काही ठोस कारणं आहेत,’ असं मोदी यावेळी म्हणाले.

२०३६ साठी भारताने ऑलिम्पिक (India’s 2036 Olympic Bid) आयोजनाचा दावा केला तर तोपर्यंत भारत हा जगातील सगळ्यात तरुण देश झालेला असेल. आणि ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेमुळे देशात क्रीडासंस्कृतीही चांगली रुजेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.