येत्या ५ नोव्हेंबर पर्यंत पश्चिम मार्गावर ब्लॉक (Central Railway Block) सुरु आहे. तर दुसरीकडे मध्य रेल्वेवरही दोन दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस प्रवाशांना प्रवासादरम्यान त्रास होणार आहे.
अधिक माहितीनुसार, टिटवाळा ते कसारादरम्यान (Central Railway Block) अप आणि डाउन मार्गावर पादचारी पुलाच्या गर्डर उभारणीसाठी शनिवारी-रविवारी म्हणजेच २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मध्य रेल्वेने विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. या दरम्यान पाच लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, १६ मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणारी शेवटची कसारा लोकल उद्या, शनिवारी रात्री साडेनऊ वाजता रवाना होणार आहे.
असे असेल विशेष ब्लॉकचे वेळापत्रक
ब्लॉक कुठे?
स्थानक : टिटवाळा ते कसारा
वेळ : शनिवारी रात्री १२.३० ते रविवारी पहाटे ५.३०
शनिवारी या लोकल सेवा रद्द असतील
– सीएसएमटी-कसारा : रात्री १०.५०
– सीएसएमटी-कसारा : रात्री १२.१५
रविवारी या लोकल सेवा रद्द
– कल्याण-आसनगाव : पहाटे ५.२८
– कसारा-सीएसएमटी : पहाटे ३.५१
– कसारा-सीएसएमटी : पहाटे ४.५९
(हेही वाचा – ED summons : मुख्यमंत्री गेहलोत यांच्या मुलाला ईडीचे समन्स)
शनिवारी शेवटची लोकल
– सीएसएमटी-कसारा : रात्री ९.३२
– कल्याण-कसारा : रात्री ११.०३
– कसारा-कल्याण : रात्री १०.००
रविवारी पहिली लोकल
– कल्याण-कसारा : पहाटे ५.४८
– कसारा-कल्याण : पहाटे ६.१०
मेल-एक्स्प्रेसच्या वेळेवर परिणाम
मध्य रेल्वेने (Central Railway Block) दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक १२१०६ गोंदिया-सीएसएमटी विदर्भ एक्स्प्रेस गोंदियावरून तीन तास विलंबाने धावणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community