Sunil Gavaskar on Virat Kohli : विराटच्या ५०व्या शतकाबद्दल गावसकर यांनी केलं मोठं भाष्य

199
Virat Kohli : कोहलीच्या प्रगतीचं श्रेय सुनील गावस्कर यांनी धोनीला का दिलं?

ऋजुता लुकतुके

विराट कोहली (Sunil Gavaskar on Virat Kohli) एका मोठ्या विक्रमापासून एक पाऊल दूर आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ४९ शतकांच्या सचिन तेंडूलकरच्या विक्रमाशी बरोबरी साधण्यासाठी त्याला फक्त एक शतक हवं आहे. हे शतक अगदी दृष्टिक्षेपात असल्यांचं भाकीत माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी केलं आहे. ‘विराट आपलं ४९ वं शतक तर लवकर ठोकेलच शिवाय विक्रमी ५०वं शतक तो आपल्या वाढदिवसाच्या दिवशी ठोकेल,’ असं सुनील गावसकर यांनी एका कार्यक्रमात बोलून दाखवलं आहे.

विराटचा ३५ वा वाढदिवस ५ नोव्हेंबरला आहे. त्या दिवशी भारतीय संघ कोलकात्याच्या ईडनगार्डर्न्स मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. आणि तगड्या प्रतिस्पर्ध्या समोर विराट ५०वं शतक ठोकेल असं सुनील गावसकर (Sunil Gavaskar on Virat Kohli) यांना वाटत आहे. विश्वचषक स्पर्धेचं भारतात थेट प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

‘काय तो माहौल असेल लक्षात घ्या. विराटचा वाढदिवस आहे. ईडनगार्डन्सवरचे प्रेक्षक विराटचं कौतुक करायला त्याला उभं राहून मानवंदना देतायत. वातावरणात शिट्या आणि टाळ्यांचा आवाज भरून राहिला आहे. असं सगळं चित्रच डोळ्यासमोर येतंय. कारण, ईडनगार्डर्न्सचे प्रेक्षक असं करतात. खेळाडूंचा उत्साह वाढवतात. आणि तिथे खेळणं हा अनुभव यादगार असतो. तिथेच विराटची (Sunil Gavaskar on Virat Kohli) फलंदाजीही बहरून येईल. आणि तो ५०वं शतक ठोकेल,’ असं गावसकर या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

(हेही वाचा – Virat Kohli : नेट्समध्ये जेव्हा विराट कोहली शुभमनला गोलंदाजी करतो…)

गावसकर (Sunil Gavaskar on Virat Kohli) यांचं हे भाकीत खरं ठरेल का हे येणारा काळच सांगेल. विराटने आतापर्यंत या स्पर्धेत ५ सामन्यांमध्ये ३५४ धावा केल्या आहेत. यात एक शतकही आहे. आणि गावसकर यांचं म्हणणं खरं करण्यासाठी विराटला मधल्या दोन सामन्यांपैकी एका सामन्यात आधी ४९ वं शतक करावं लागेल!

भारताचा पुढील सामना २९ ऑक्टोबरला लखनौमध्ये इंग्लंड (Sunil Gavaskar on Virat Kohli) विरुद्ध आणि २ नोव्हेंबरला मुंबईत श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. आणि त्यानंतरचा सामना ५ नोव्हेंबरला ईडनगार्डन्सवर असेल. सुनील गावसकर यांच्या बोलण्यातील गमतीचा भाग सोडून दिला. तरी त्यांच्या बोलण्यात कोहलीबद्दल सकारात्मकता दिसून आली. आणि ४८ पासून ५०व्या शतकापर्यंत जायला त्याला वेळ लागणार नाही, एवढं नक्कीच त्यांना सुचवायचं होतं.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.