Israel Hamas War : भारत-मध्य पूर्व आर्थिक कॉरिडॉर हे हमास हल्ल्याचे संभाव्य कारण – राष्ट्राध्यक्ष बायडेन

155
Israel Hamas War : भारत-मध्य पूर्व आर्थिक कॉरिडॉर हे हमास हल्ल्याचे संभाव्य कारण - राष्ट्राध्यक्ष बायडेन

हमास आणि इस्त्रायल युद्धाला (Israel Hamas War) २० दिवसांपेक्षा जास्त दिवस उलटून गेले आहेत. पण, अद्यापही इस्रायल आणि हमासकडून एकमेकांवर हल्ले सुरूच आहेत. या युद्धामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला, सर्वत्र मृतदेह विखुरले गेले, मालमत्तेचे नुकसान झाले, कुटुंबे उद्ध्वस्त झाली.

अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हमास ने इस्रायलवर (Israel Hamas War) केलेल्या हल्ल्यामागचे संभाव्य कारण सांगितले आहे. जो बायडेन यांच्या मतानुसार भारत-मध्य पूर्व आर्थिक कॉरिडॉर हा प्रकल्प हमास आणि इस्त्रायल युद्धाचं कारण बनला आहे.

नेमकं काय म्हणाले बायडेन?

“इस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी हमासने (Israel Hamas War) केलेल्या हल्ल्यामागे भारत-मध्यपूर्व-युरोपीय आर्थिक कॉरिडॉरची (आयएमईईसी) घोषणा हे एक मोठे कारण असले पाहिजे. माझ्याकडे याचा पुरावा नाही. परंतु माझा अंतरात्मा हे सांगतो. हमासला क्षेत्रीय एकीकरण पटले नसावे. पण आम्ही हमासला यशस्वी होऊ देणार नाही. पण कॉरिडॉरचा प्रकल्प नक्कीच यशस्वी करू.”

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी (Israel Hamas War) बुधवारी म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत ही टिप्पणी केली.

(हेही वाचा – ED summons : मुख्यमंत्री गेहलोत यांच्या मुलाला ईडीचे समन्स)

काय आहे भारत-मध्यपूर्व-युरोपीय आर्थिक कॉरिडॉर हा प्रकल्प?

नवी दिल्ली येथे झालेल्या जी-20 शिखर परिषदेदरम्यान, (Israel Hamas War) भारत, अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि युरोपियन युनियनने भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक मार्गिका स्थापन करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिया, पश्चिम आशिया, मध्य पूर्व आणि युरोप यांच्यातील वर्धित संपर्क आणि आर्थिक एकत्रीकरणाच्या माध्यमातून ही मार्गिका आर्थिक विकासाला प्रोत्साहन आणि चालना देईल.

भारत-मध्य पूर्व-युरोप भारताला पश्चिम आशिया/मध्यपूर्वेशी जोडणारा पूर्व मार्गिका आणि पश्चिम आशिया/मध्यपूर्वेस युरोपशी जोडणारा उत्तर मार्गिका या दोन स्वतंत्र मार्गिकांचा समावेश आर्थिक मार्गिकेमध्ये असेल. (Israel Hamas War)

यात एका रेल्वे मार्गाचा समावेश असेल, जो पूर्ण झाल्यावर, भारतामार्गे दक्षिण पूर्व आशिया ते पश्चिम आशिया/मध्य पूर्व युरोप दरम्यान वस्तू आणि सेवांचे हस्तांतरण वाढवणाऱ्या विद्यमान बहुआयामी वाहतूक मार्गांना पूरक म्हणून एक विश्वासार्ह आणि किफायतशीर सीमापार जहाज-ते-रेल्वे संक्रमण जाळे प्रदान करेल.

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अलीकडेच या कॉरिडॉरचे कौतुक केले आणि सांगितले की हा प्रकल्प दोन खंडांमध्ये गुंतवणुकीच्या संधींना चालना देईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.