भारत ही श्रावणकुमार यांची भूमी आहे. (Service to Parents) वृद्धांची देखभाल करणे, हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे. नैतिकच नाही, तर त्याला कायद्याचेही बंधन आहे. ते कर्तव्यही आहे. मुलांनी वृद्ध आई-वडिलांची सेवा करणे, हे पितृऋण फेडण्यासाठी आहे, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने ८५ वर्षीय छवीनाथ यांच्या याचिकेवर सुनावणी करतांना म्हटले. छवीनाथ यांना त्यांच्या मुलांकडून वाईट वागणूक देण्यासह संपत्तीतून बेकायदेशीरित्या वगळले आहे. यामुळे त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणाची सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हंडिया परिसरातील एस्.डी.एम्. ला सर्व पक्षांशी 6 आठवड्यांत चर्चा करून हे प्रकरण सोडवण्याचे आदेश दिले. (Service to Parents)
(हेही वाचा – Mumbai Crime : महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने मुंबईत खळबळ, हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न )
न्यायालयाने पुढे म्हटले की, वृद्धपणात लोक केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक त्रासांविरुद्धही लढत असतात. नेहमीच असे पहाण्यात येते की, संपत्ती मिळाल्यानंतर मुले आई-वडिलांना निराधार करतात. हे चुकीचे आहे. मुलांनी श्रावण कुमारसारखे बनले पाहिजे. (Service to Parents)
अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या एका निरीक्षणात भारताचे वर्णन श्रावण कुमारांची भूमी असे केले आहे. आजची मुले त्यांच्या वृद्ध पालकांची सेवा आणि काळजी घेतील, अशी न्यायालयाला आशा होती. 85 वर्षीय छबीनाथ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. या याचिकेत छबीनाथ यांनी त्यांच्या मुलांवर गैरवर्तन केल्याचा आणि बेकायदेशीरपणे त्यांची मालमत्ता हडप केल्याचा आरोप केला आहे. (Service to Parents)
श्रावण कुमारकडून पालकांप्रती समर्पण शिका
या खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने टिप्पणी केली आहे की, भारत हा सांस्कृतिक मूल्ये आणि नैतिकता जपणारा देश आहे. ज्येष्ठांची काळजी घेणे हा या संस्कृतीचा एक आहे. वृद्धापकाळात मुलांकडून पालकांची सेवा करणे हे पितृऋण मानले जाते. पालकांची सेवा ही केवळ नैतिक आणि सांस्कृतिक मूल्यांवर आधारित नाही तर ती कायदेशीर जबाबदारी देखील आहे, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. यासाठी न्यायालयाने संसदेने मंजूर केलेल्या ‘ज्येष्ठ नागरिक कायदा 2007’चा संदर्भ दिला. अलाहाबाद उच्च न्यायालयानेही आपल्या भाषणात भावनिक पैलूंचा संदर्भ दिला. न्यायालयाने इतिहासातील श्रावण कुमारकडून पालकांप्रती समर्पण शिकण्याची आठवण करून दिली. (Service to Parents)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community